🌟रासायनिक व सेंद्रिय घटकांचा संतुलित वापर करावा - कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि परभणी :- परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत “परंपरागत शेतीपासून आधुनिक शेतीकडेचा प्रवास” या विषयावर एक विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ५ एप्रिल रोजी करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम हॉल (हॉल क्र. १८) येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून गो-सेवा गतिविधीचे अखि…
🌟जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा माथूर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान🌟 पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील कमलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असणारे संतोष रत्नपारखे यांना जिल्हा परिषद परभणी तर्फे आयोजित नुकत्याच भव्य सोहळ्यात जिल्हास्तरीय उत्कृष्ट पुरस्काराने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा माथूर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील पोलास, योजना शिक्षणाधिकारी संजय ससाणे, डायटचे प्राचार्…
🌟शोभा यात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केले🌟 परभणी : - परभणी शहरात श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त उद्या रविवार दि.६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शोभा यात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केले आहे यंदा प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे ठरवण्यात आले त्यानुसार समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले आहेत . यंदाचे प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती यांचे हे १३ व…
🌟न्यायालयाचा सात वर्षांनी निकाल : दोषींना ११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे🌟 मुंबई :- संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सात वर्षांपूर्वी गाजलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला पनवेल न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आले आहे या हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी राजू पाटील याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या हत्येनंतर दुसऱ्याच वर्षी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरचे राष्ट्रपती पदकासाठी नाव सुचविल्याबद्दल न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. त्याचसोबत या प्रकरणाच्या तपासा…
🌟वांद्रे कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत माझगाव न्यायालयाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावली🌟 मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आज शुक्रवार दि.०५ एप्रिल रोजी न्यायालयाने चांगलाच धक्का दिला आहे वांद्रे कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत माझगाव न्यायालयाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावली आहे. वांद्रेच्या कुटुंब न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला २ लाख रुपयाची पोटगी द्यावी, असा निकाल दिला होता. या निर्णयाला धनंजय मुंडे यांच्याकडून माझगाव कोर्टात…
🌟बाधित क्षेत्राचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी🌟 परभणी (दि.०५ एप्रिल २०२५) :- परभणी जिल्ह्यात अचानकपणे झालेल्या वादळीवारे व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या बाधित क्षेत्रांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन माजी खासदार तथा शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश जाधव यांनी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिले. माजी खासदार सुरेश जाधव यांनी जिल्हाधिकारी गावडे यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की परभणी जिल्ह्यात सर्वत्र दि.०३…
🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी राज्यातील पत्रकारांना सर्वतोपरी संरक्षण देण्याची मागणी केली🌟 परभणी - देशातील लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्रसृष्टी व पत्रकारांवर सध्या महाराष्ट्रामध्ये धन दांडगे,गुंड प्रवृत्तीचे राजकारणी व वेगवेगळ्या गटातील माफियाकडून, आपल्या मनाजोगत्या बातम्या प्रसिद्ध न करता विरोधात वृत्त प्रकाशित केल्याबद्दल पत्रकारांवर जीव घेणे हल्ले ,खोट्या केसेस मध्ये डांबून ठेवणे ,त्यांचा छळ करणे असे प्रकार वाढले असल्यामुळे पत्रकारांना जीव मुठीत धरून आपले कर्तव्य बजावावे लागत आहे, महाराष्ट्रात प…
🌟काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टिका🌟 मुंबई : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने संसदेत मांडलेले वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक राज्यसभा व लोकसभेत मंजूर झाल्यानंतर देशभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक…
🚉महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र सरकारने केली ४,८१९ कोटींची तरतूद🚉 नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने काल शुक्रवार दि.०४ एप्रिल २०२५ रोजी रेल्वेच्या एकूण १८,६५८ कोटी रुपयांच्या ४ मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली ज्यात महाराष्ट्र, ओडिसा आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील १५ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे जाळे सुमारे १,२४७ किमीने वाढणार आहे. वात्त महाराष्ट्रातील ४,८१९ कोटी रपदांच्या गोंदिया-बल्लारशहा मार्गावरील २४० किमी लांबीच्या लाइन दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश आ…
🌟राजकीय पक्षांना मिळालेले १६,५१८ कोटी रुपये जप्त करण्याची मागणी फेटाळून लावली🌟 नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांशी संबंधित याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. याचिकेत न्यायालयाला त्यांच्या जुन्या निर्णयाचा आढावा घेण्याची विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने आपल्या आधीच्या निर्णयात राजकीय पक्षांना मिळालेले १६,५१८ कोटी रुपये जप्त करण्याची मागणी फेटाळून लावली होती. माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक बाँड योजना रद्द केली होती.....