💥इस्रोकडून होणार लवकरच नवीन तारीख जाहीर💥
✍ मोहन चौकेकर
🛰भारतच्या चांद्रयान 2 मोहिमेला तांत्रिक विघ्ण आले आहे. त्यामुळे नियोजित चांद्रयान 2 चे प्रक्षेपण रद्द कारण्यात आले आहे. इस्रोकडून लवकरच नवीन तारीख जाहीर होणार आहे.
सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनीटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. मात्र ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द करण्यात आले आहे. भारताच्या या महत्वकांक्षी प्रक्षेपणाकडे साऱ्या देशाचे आणि जगाचे लक्ष लागले होते. मात्र तांत्रिक विघन आल्यामुळे चांद्रयान 2 मोहिमेची सुरवात नकारात्मक झाली आहे.
दरम्यान अवकाश संशोधनात भारत उत्तरोत्तर प्रगती करत आहे. तसेच भारत हा जगात अवकाश संशोधन करणाऱ्या देशांपैकी एक महत्वाचा देश आहे. चांद्रयान 2 च्या लॉन्चिंग नंतर ५२ दिवसांनी ‘चांद्रयान-२’ चंद्रावर पोहोचणार होतं. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरणार आहे.
या मोहिमेत चांद्रयान 2 चंद्रावरील खनिज्यांचा, वातावरणाचा, आणि विशेष म्हणजे पाण्याचा शोध घेणार आहे. तसेच चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही, अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ पोहचणार आहे....
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या