💥जम्मू-कश्मीर खोऱ्यात पावसाचा जोर वाढला आहे.💥
जम्मू-काश्मीरमध्ये पुढील काही दिवसामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे जम्मू आणि श्रीनगर दरम्यान दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सावधगिरीचा उपाय म्हणून अमरनाथ यात्रा 4 ऑगस्ट पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.जम्मू-कश्मीर खोऱ्यात पावसाचा जोर वाढला आहे. बालटाल आणि पहलगाम येथे झालेल्या तुफानपावसामुळे दोन्ही मार्गावर भूस्खलन होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच चालताना पाय घसण्याची शक्यता वाढली आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोरही वाढण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याचा इशाऱ्यानंतर अमरनाथ यात्रा 4 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली आहे...
0 टिप्पण्या