💥शेतकऱ्यांचे बँकात बोगस खाते काढून परस्पर अनुदान उचलणाऱ्या ऋषी सहाय्यकासह अन्य एकास अटक💥
प्रतिनिधी/२७ जुलै
पूर्णा/तालुक्यातील ३०६ शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन करिता देण्यात आलेले तब्बल ३० लाख रुपयांचे अनुदान परस्पर रित्या उचलून अपहार केल्याप्रकरणी गुन्ह्यातील आरोपींना पुर्णा पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकून गजाआड केले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मौजे लोखंडे पिंपळा येथिल शेतकरी सुर्यभान गंगाधर लोखंडे यांनी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन संचाकरीता पुर्णा कृषी कार्यालया मार्फत कोणताही अर्ज केला नव्हता.परंतू त्यांच्या नावे कोणीतरी बोगस कागदपत्रे तयार करून संच व त्यावरील मिळणारे२४ हजार ९८० रुपये अनुदान परस्पर उचलून अपहार केल्याचे उघडकीस आले. सदरील शेतकऱ्यांच्या नावे ताडकळस येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत कोणीतरी परस्पर खाते उघडून त्यांच्या नावे आलेले ठिबक सिंचन योजनेचे२४ हजार ९८० रुपये अनुदान परस्पर उचल्याने तो ही चक्रावला.यावरुन लोखंडे यांनी परभणी उपभिभागीय कृषी अधीका-यांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.याप्रकरणी उपविभागीय कृषी अधीका-यांनी तालुका कृषी अधीका-यांना सदरील प्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले यावरुन पुर्णा पोलीस ठाण्यात तालुका कृषी अधिकारी खुपसे यांच्या तक्रारीवरून कलम 420,468, 471, 409, 120 (b) भा. द. वि. प्रमाणे दि.जुन २०१८ रोजी गुन्हा करण्यात आला होता.
दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल होताच याचा तपास फौजदार चंद्रकांत पवार यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला होता.मागील काही दिवसांपासून जोमाने तपास करुन याप्रकरणात खोलात जाऊन पुर्णा तालुक्यात प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेत अश्याच पद्धतीने तब्बल ३०६ शेतकऱ्यांची कागदपत्रे तयार करून ताडकळस येथिल बँकेत बनावट खाते उघडून तब्बल ३० लाख रुपयांचे अनुदान परस्पर उचलून घेतल्याचे निष्पन्न केले.याप्रकरणात कृषी विभाग, बँक,व्यापारी आदींचेमोठे रॅकेट असल्याचेही तपासात उघडकीस आले असून याच प्रकरणात आज पुर्णा पोलीसांना हवे असलेल्या आरोपी पैकी हरिष वंजे व कृषी साहाय्यक श्याम यशमोड यांना मा. न्यायालयाने तात्पुरता अटक पूर्व जमीन दिला होता. तपासातील आरोपी विरुद्ध भरपूर पुरावा पुर्णा पोलिसांनी सादर केल्यानंतर न्यायालयाने दिलेला अटकपूर्व जामीन रद्द केला होता.आज शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पो.नि.सुभाष राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी हरीष वंजे व शाम यशमोड कृषी साहाय्यक यास नांदेड येथून फौजदार चंद्रकांत पवार, नितीन वडकर, विष्णु भिसे यांनी छापा टाकून ताब्यात घेतले.
शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या या योजनेत अपहार केलेले अजूनही मोठे मासे पोलीसांच्या कचाट्यात अडकणार असल्याचे दिसून येत आहे....
0 टिप्पण्या