💥अनेक गावांतील हजारों ब्रास अवैध रेती साठे अखेर गेले तरी कुठे ? जप्त रेती साठ्यांची महसूल प्रशासनात नोंद का नाही ?💥
-----------------------------------------------------------@ पोलीस प्रशासनाच्या गुप्तचर यंत्रणे पेक्षासी सतर्क रेती तस्करांची गुप्तचर यंत्रणा @
------------------------------------------------------------💥भयाण वास्तव - चौधरी दिनेश (रणजीत)
पुर्णा/पुर्णा-गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करुन हजारों ब्रास रेतीची अंदाजे ८५ ते ९० टिप्पर तर ४५ ते ५० ट्रेक्टर आदी वाहनांतून खुलेआम तस्करी होत असतांना स्थानिक महसूल प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी रेती तस्करांशी आर्थिक हितसंबंध सोईस्कररित्या जोपासत जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यात धुन झोकन्यासाठी महिण्याकाठी दोन-चार रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ठरल्या प्रमाणे कारवाई करीत रेती तस्करी विरोधात महसूल प्रशासन किती सतर्क आहे असे दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न करतांना पाहावयास मिळत आहे.@ पोलीस प्रशासनाच्या गुप्तचर यंत्रणे पेक्षासी सतर्क रेती तस्करांची गुप्तचर यंत्रणा @
जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या गुप्तचर यंत्रणे पेक्षाही सुसज्ज आणी सतर्क अशी स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा जिल्ह्यातील रेती तस्करांनी उभारली असून रेती तस्करांनी ऊभारलेल्या या गुप्तचर यंत्रणेला 'लोकेशन गँग' असे संबोधण्यात येते या 'लोकेशन गँग' मधील कार्यरत असंख्य गुप्तहेरांकडे ४ जी ॲनराईड मोबाईल असून रेती तस्करांनी या 'लोकेशन गँग' मधील कार्यरत गुप्तहेरांचे असंख्य वाट्सअप ग्रुप तयार केले आहेत या वाट्सअप ग्रुप मध्ये जिल्ह्यातील अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर ॲड करण्यात आल्याने महसुल प्रशासनातील वरीष्ट अधिकारी रेती तस्करांची वाहन पकडण्यास निघण्या अगोदरच सदरील वाट्सअप ग्रुप वरुन जिल्ह्यातील रेती तस्करांना तात्काळ संदेश पाठवला जातो त्यामुळे पाहता पाहता रेती तस्कर राष्ट्रीय राज्यमार्गांवर तसेच विविध मार्गांवर धावणारी आपली वाहन अदृश्य करतात.
@ पुर्णा - गोदावरी नदी पात्रांतून अवैध उत्खनन करुन परिसरातील गावांमध्ये रेती तस्करांनी साठवलेले हजारो ब्रास साठे अखेर गेले कुठे ? @
तालुक्यातील धानोरा मोत्या,सातेफळ,रुंज,छोटे पेनूर,धनगर टाकळी,गंगाजी बापू (पिंपळगाव लिखा),कंठेश्वर,कानखेड,महागाव,वझूर,आदी गावांसह पुर्णा शहरातील विविध भागात तसेच पुर्णा नदी च्या आसपास रेती तस्करांनी पुर्णा-गोदावरी नदी पात्रांतून प्रचंड प्रमाणात जेसीबी मशीनच्या साह्याने उत्खनन करुन हजारों ब्रास रेतीचे साठे केले होते यातील महागाव या गावातील रेती साठ्यातील २५% रेती साठा शासकीय घरकूल योजनातील लाभधारकांसाठी देण्यात आला परंतु उर्वरीत साठ्यासह अन्य गावांतील हजारों ब्रास रेतीसाठा मे २०१९ जुलै २०१९ या कालावधीत कुठलाही अधिकृत लिलाव नकरता जप्तीनाट्य रंगवून महासुल प्रशासनाने घातला तरी कोणाच्या घशात ? असा प्रश्न उपस्थित होत असून सदरील हजारों ब्रास अवैध रेतीच्या साठ्याची महसूल प्रशासनाने कश्या पध्दतीने विल्हेवाट लावली याची जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी जनसामान्यांतून होतांना दिसत आहे..
0 टिप्पण्या