🔹४५ दिंड्यांतील हजारो वारकरी सुखावले 🔹
गंगाखेड :
येथील सवंगडी कट्ट्याच्या वतीने चालवण्यात आलेला वारकरी सेवा महायज्ञ डॉंक्टर मंडळींचा सन्मान करत संस्थगीत करण्यात आला. या पंधरा दिवसांच्या सेवा ऊपक्रमातून ४५ दिड्यांमधील पाच हजारावर वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. पुढील वर्षी ईतरही काही सेवा देत याच ऊत्साहाने वारकऱ्यांची सेवा करण्याचा संकल्प यावेळी सवंगडी कट्टा समुहाच्या सदस्यांनी व्यक्त केला.
२२ जून पासून गंगाखेड हून पंढरपुरकडे पायी मार्गस्थ झालेल्या पालख्यांमधील वारकऱ्यांची सर्व प्रकारची सेवा करण्यात आली. खास करून आरोग्य तपासणी, मोफत औषधी आणि करण्यात येत असलेली बॉडी मसाज वारकऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद देवून गेली. यावर्षी विविध क्षेत्रातील युवक, महिलांनी सहभाग नोंदवला. आरोग्य तपासणीत सहभागी होत आपला वेळ देणारे शहरातील डॉक्टर्स आणि मदत करणारांचा शेवटच्या दिवशी यथोचीत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गंगाखेडचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.हेमंत मुंढे, डाॅ. योगेश मल्लुरवार, डाॅ.बी.जी.जोशी, डाॅ.देविदास चव्हाण, डाॅ.श्री व सौ.भरड, डाॅ.सचिन सुपेकर, डाॅ.भरत भोसले, डाॅ.मनिष बियाणी आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती. रमेश औसेकर ,प्रकाश घण, मनोज नाव्हेकर, नागेश पैठणकर, नागेश कोनार्डे ,विनय नाल्टे, प्रजित शिंदे, सदानंद कुलकर्णी कृष्णा तापडीया, अक्षय जैन, दिलीप सोळंके , कारभारी निरस, संतोष लबडे, अभी पंडीत,पाठक बंधू आदिंनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज नाव्हेकर यांनी तर आभार प्रदर्शन गोविंद यादव यांनी केले....
0 टिप्पण्या