💥१ लाख ३५ हजार रुपये रोख रक्कमेसह एकूण ३ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज केला चोरट्यांनी लंपास💥
पुर्णा/येथिल विजयनगरातील एका इसमाच्या घराला कुलूप असल्याचा फायदा घेऊन, रविवारी (ता.२८) रोजी रात्री घराचे कुलूप तोडून घरातील कपाटा तील सोन्याच्या दागिन्यांसह १लाख ३५ हजार नगदी असा एकूण ३ लाख ३४ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी २८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पुर्णा पोलीसांत अज्ञात चोरां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, गजबजलेल्या वसाहतीतील विजय नगरात फिर्यादी शेख नौशाद अहमद शेख मुस्ताक कुरेशी मागील काही दिवसांपासून आपल्या कुटुंबीयांसह राहतो. रिलायबल (हड्डी कारखान्यात) अॅग्रो कंपनीत कर्मचारी आहे. ता.२५ रोजी त्याची पत्नी मुर्तीजापूर येथे माहेरास गेली होती.नौशाद कुरेशी रविवारी सायंकाळी ६ वाजता आपल्या कामावर जेवण करुन घराला कुलूप लावून कारखान्यात कामाला गेला होता.त्याच मध्यरात्री रविवारी २८ रोजी अज्ञात चोरट्यांनी कुरेशी यांच्या घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत गेटचे कुलूप तोडले घराच्या आत प्रवेश करुन घराच्या दरवाजाचे व घरातील बेडरुम असलेल्या कपाटाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले गंठण,सेवनपिस, चैन,मणी,कानातील डुल,लाॅकेट, अंगठी,आदीं १लाख ३५ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
सकाळी शेजा-यांनी सकाळी शे. नौशाद यांना या घटनेची माहिती दिली. त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले.त्यावरुन पुर्णा पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस उप विभागीय अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले पोलिस निरीक्षक सुभाष राठौड, यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पंचनामा करण्यात आला. शे.नौशाद शे.मुस्ताक कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पूर्णा पोलिसात अज्ञात चोरट्यां विरोधात कलम ४५७,३८० प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या