@सखाराम बोबडे, गोविंद यादव यांचा पुढाकार@
गंगाखेड/ष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी आणि नेट कनेक्टिव्हीटी मुळे पोर्टलचा उडालेला बोजवारा पाहता पिक विमा भरण्याच्या योजनेस मुदतवाढ मिळण्याची मागणी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर,गोविंदराव यादव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मंगळवारी केली.
या निवेदनात म्हटले आहे की मागील चार-पाच वर्षांपासून गंगाखेड विधानसभा मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. गेल्या वर्षी दुष्काळ जाहीर होऊनही आजपर्यंतच्या अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांना कडे पैसे नाहीयेत, आणि दुसरीकडे नेट कनेक्टिव्हीटी अभावी पीक विम्याचे पोर्टल चालत नाही .या ना त्या कारणाने एकूण मतदारसंघातील 25 टक्क्यावर शेतकरी पिक विमा पासून वंचित राहणार आहेत. त्यासाठी या योजनेस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी गंगाखेड तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदराव यादव, मैराळसांवगीचे सरपंच अनतराव जाधव, ज्येष्ठ नेते बाबुराव गळाकाटु, शंकररावजी मोरे, भांबरवाडीचे मारुती भामरे, संजीवन नाथराव मुंडे, मनसेचे यादव महात्मे, निळानाईक तांडाचे सरपंच भिमराव व्यंकट चव्हाण, सेलमोहा सरपंच प्रदीपभाऊ मुंडे. विठ्ठल संभाजी खांडेकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यासंदर्भात गंगाखेड विधानसभा मतदार उमेदवार संघाचे सखाराम बोबडे पडेगावकर यांनी क्रुषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे कार्यालयाशी संपर्क साधला असता, पीक विमा योजनेस योजना ही केंद्र शासन चालवत असल्याने या योजनेस मुदतवाढ देणे राज्याच्या अधिकारा बाहेर असल्याचे स्वीय सहाय्यक हितेद्र पाटील यांनी सांगीतले...
0 टिप्पण्या