💥मराठा आरक्षणाच्या निर्णयानुसार मराठा समाजातील युवकांना 851 पदांचा लाभ मिळणार💥
राज्य शासनाच्या धोरणानुसार महावितरण कंपनीत मेगा भरती करण्यात येणार असून कंपनीने सात हजार पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयानुसार मराठा समाजातील युवकांना 851 पदांचा लाभ मिळणार आहे;तर अनाथ युवकांना 20 जागांचा लाभ मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्युत सहायक पदासाठी तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार असून तीन वर्षांनंतर कायम सेवेत सामावून घेतले जाणार आहे. या पदासाठी पाच हजार जागा रिक्त आहेत. या मध्ये अनुुसूचित जाती प्रवर्गासाठी 375 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 236 पदे आहेत. विमुक्त जातीकरिता (अ) 109 जागा, भटक्या जमाती (ब) साठी80, भटक्या जमाती (क) साठी 118, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 44 जागा राखीव आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी 81, इतर मागास प्रवर्गाकरिता 1507, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग (मराठा) साठी 606, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 466, जागा आरक्षित आहेत. तर खुल्या प्रवर्गासाठी 1378 जागा आहेत. दिव्यांगांसाठी 100 जागा तर अनाथ उमेदवारांसाठी 114 जागा ठेवण्यात आल्या आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची मूदत 13 ते 26 जुलै आहे. यादी 30 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दहावीतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे निवड करण्यात येणार आहे. यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. दोन हजार उपकेंद्र सहायक या रिक्त पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 226, अनुसूचित जमातीसाठी 196, विमुक्त जातीकरिता (अ) 65 जागा, भटक्या जमाती (ब) साठी 45, भटक्या जमाती (क) साठी 57, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 44 जागा राखीव आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी 29, इतर मागास प्रवर्गाकरिता 355, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग (मराठा) साठी 245, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 191, जागा आरक्षित आहेत. तर खुल्या प्रवर्गासाठी 547 जागा आहेत. दिव्यांगांसाठी 41 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत; तर अनाथ उमेदवारांसाठी सहा जागा ठेवण्यात आल्या आहेत. विद्युत सहायक पदासाठी 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा आहे. मागासवर्गीयांसाठी पाच वर्षे शिथिल आहे. माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. खेळाडूसाठी पाच वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्यात आली. या पदासाठी दहावी पास आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वायरमन अथवा इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. तर अप्रेंटिसशिप पूर्ण केलेले प्रमाणपत्रदोन वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे. या पदासाठी 13 ते 26 जुलै अखेर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. ऑगस्ट 2019 मध्ये ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे....
0 टिप्पण्या