💥दुकानातून चोरट्यांनी चार हजारासह मोबाईल पळवला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल💥
पूर्णा/शहरात दर सोमवार-शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात येणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडल्याचे दिसत असून बाजाराला येणाऱ्या महिलांचे दागीने तसेच पुरुषांची मोबाईल पाकीट पळवण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असून ग्रामीण भागातून शहरात बाजारासाठी आलेले लोक मोबाईल/पाकीट तसेच दागिन्यांच्या चोरीच्या घडलेल्या घटनां नंतर कुठलाही गुन्हा दाखल नकरता सरळ गावाकडे निघून जातात त्यामुळे चोरीच्या नेमक्या किती घटना घडताय याची नोंद होत नाही त्यामुळे चोरट्यांच्या टोळ्या प्रत्येक आठवडी बाजारात हजेरी लावून धुमाकूळ घालतांना पाहावयास मिळत आहेत आतातर चोरट्यांनी आपला मोर्चा शहरातील दुकानांकडे वळवल्याचे दिसत असून भरदिवसा मुख्य रस्त्यावरील एका मशनरी स्टोअर्स मधून ग्राहक बनुन आलेल्या एका चोरट्यांने दुकानातील ४ हजार ५०० रुपये व ११ हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन चोरुन नेल्याची घटना सोमवारी आठवडी बाजाराच्या दिवशी ८ जुलै रोजी दु १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली असून पुर्णा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,
शहरात मागील काही दिवसांपासून पुर्णा पोलीसांच्या डोळ्यात धुळ झोकून आठवडी बाजाराच्या दिवशी चोरटे नवं नविन हातखंडा वापरीत पाकीट चोरी,चैन चोरी,मोबाईचोरी सारख्या घटना घडवून आणीत आहेत.सोमवारी ७ रोजी आठवडा बाजाराच्या दिवशी येथिल मुख्य रस्त्यावरील शिवाजी भालेराव यांचे मशनरी स्टोअर्स चे दुकान आहे.दुपारी१२;३० वाजण्याच्या सुमारास ते आपल्या दुकानात बसलेले असताना एक अनोळखी अंगात काळा शर्ट व जिन्स पॅन्ट घातलेला ३० ते ३५ वर्षिय ईसम दुकानात येऊन गार्डन पाईप,व यु पी.व्ही.सी पाईची मागणी करतो.त्या ईसमास साहीत्य काढून देत असताना घरी जाऊन पैसे आणतो म्हणत गल्ल्याजवळ ठेवलेले ४ हजार ५०० रुपये व त्यावर ठेवलेला रेडमी नोट फोर कंपनीचा ११ हजार रुपये किंमतीचा मोबाईल घेऊन पळून गेला.या घडलेल्या घटनेनंतर शिवाजी रामराम भालेराव यांनी पुर्णा पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरनं२०७/१९ कलम ३८० अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास जमादार अर्जुन रणखांब हे करित आहेत.....
0 टिप्पण्या