💥सखाराम बोबडे पडेगावकर यांचे आवाहन💥
शाळा व महाविद्यालय प्रवेशासंदर्भात कसलीही अडचण असल्यास महाराष्ट्रातील धनगर समाजासह ईतर गोरगरीब पालक व विद्यार्थ्यांनी थेट संपर्क केल्यास ती सोडविण्यासाठी निश्चितच पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिले.
यासंदर्भात अधिक माहिती देताना बोबडे यांनी सांगितले की शाळा व महाविद्यालयाच्या प्रवेशाचा कालावधी उलटून एक महिना संपत आलेला आहे. तरी पण पैशाच्या अडचणीमुळे बऱ्याच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रवेश अडकून पडले आहेत. कोणत्याही कारणाने शालेय व महाविद्यालयात प्रवेश संदर्भात काही अडचण असल्यास महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हा व तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी थेट संपर्क करावा. 9511922000 या नंबर वर व्हाट्सअप द्वारे आपली सविस्तर माहिती पाठवून आपल्याला ज्या संस्थेच्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे त्याची माहिती द्यावी. आपली अडचण सोडविण्यासाठी धनगर साम्राज्य सेनेचे त्या त्या भागातील स्थानिक पदाधिकारी आपल्याला येऊन मदत करतील व आपला प्रश्न सोडवतील असे आश्वासनही त्यांनी दिले. आजपर्यंत महाराष्ट्रात शंभरावर विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात मदत झाल्याचेही त्यांनी सांगितले...
0 टिप्पण्या