💥अमरावती ग्रामीण हद्दीसह यवतमाळ जिल्ह्यातही अशाच प्रकारे चोऱ्या केल्याचे आरोपीनी मान्य केले💥
वाशीम येथील मागील आठवड्यात चोरांचा धुमाकूळ घातला होता चोरांना पकडण्यासाठी पोलिसांना एक आव्हानच होते पण वाशीम पोलिसांनी हे आव्हान स्वीकार चोरानां पकडले
वाशीम येथे सुपरशाँपी किराणा दुकान, आंबेडकर चौक येथील अक्षदा किड्स कापड दुकान, पतांजली चिकित्सालय व अकोला रोड वरील हाँलीडे वाईनशाँपी च्या दुकानाचे शटर वाकवुन नगदी 135,00 रु व10,000 रु किमतीचे ड्रायफुटस व डिव्हीआर बाँक्स 500/ अशा एकुन किमंत 1,50,000 रूपयाचा मुद्देमालाची चोरी झाली होती तसेच राँयल स्पोर्ट व रौनक फर्नीचर दुकान फोडुन चोरी केली.
या मध्ये तिन चोरानां पकडले असुन त्यांचे नाव 1.. ओमप्रकाश विराराम बिस्णोई. वय 21, रा. कर्णा ता. सिनदी जि. बाडनेर राज्यस्तान
2.. कैलाश विराराम बिस्णोई. वय 23
3.. अभिशेख मोरेश्वर पवार. वय 19 रा.गणेशपुर ता. समुद्रपुर जी वर्धा
या तिन्ही आरोपी कडुन नगदी 35,319,रू व इतर साहित्य असा एकुन 1,60,819 रू किमंतीचा मुद्दमल हस्तगत करण्यात आला
तसेच सदर आरोपीनी अमरावती ग्रामीण हद्दीतील व यवतमाळ जिल्ह्यातील अशाच प्रकारे चोरी केल्याचे मान्य केले असुन सदर पोलीस ठाणे येथे या सर्व आरोपींना वर्ग करण्याची कार्यवाही चालु आहे
सदर कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक वसंत परदेशी , अपर पोलीस अधीक्षक विजय कुमार चव्हाण, सहाय्याक पोलीस अधीक्षक डाँ. पवन बनसोड, बळीराम गिते, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे, गिरीश तोगरवाड, विजय महल्ले, गजानन कहाळे, अमोल गिहे, व सायबर सेलचे दिपक घुगे यांनी कार्यवाही केली...
0 टिप्पण्या