💥'मल्का' या मद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीने भावना दुखावल्याबद्द भारतीयांची मागीतली माफी💥
✍ मोहन चौकेकर
बिअरच्या बाटलीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो लावल्यामुळे मोठा वाद निर्माण झाल्यानंतर इस्रायली मद्य कंपनीने माफी मागितली आहे. इस्रायलमधील 'मल्का' या मद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीने भावना दुखावल्याबद्दल भारत सरकार आणि भारतीयांची माफी मागितली आहे.
इस्रायलच्या 71 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या बाटलीवर महात्मा गांधींसह काही देशांच्या नेत्यांचे फोटो छापण्यात आले होते. मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित बाटल्यांचं उत्पादन आणि पुरवठा थांबवण्यात आला.दरम्यान, या प्रकरणावर केरळच्या महात्मा गांधी नॅशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष एबी जे जोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली होती.
भारत सरकार व भारतीय जनतेच्या भावना दुखवल्याबाबत आम्ही क्षमा मागतो.आम्हीही महात्मा गांधींचा सन्मान करतो, बाटल्यांवर त्यांचे चित्र लावल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, अशा शब्दात कंपनीचे ब्रँड मॅनेजर गिलाड ड्रोर यांनी माफी मागितली...
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या