💥नंदकिशोर पालवे व सौ आरती पालवे यांच्या सेवासंकल्प प्रतिष्ठाणला मिळणार जिवण गौरव पुरस्कार💥
✍ मोहन चौकेकर मागील ५८ वर्षापासून सहकारी बँकिंगच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या दि चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने पूर्वीपासून सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे. विशेषत सामाजिक क्षेत्रात बँकेची नेहमी सकारात्मक भूमिका राहिली आहे .याच भूमिकेला अनुसरून चिखली अर्बन बँकेच्या वतीने दरवर्षी सहकार , शिक्षण ,सामाजिक ,कृषी , अध्यात्मिक , क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार नंदकिशोर पालवे व सौ आरती पालवे यांच्या चिखली तालुक्यातील पळसखेड येथील सेवासंकल्प प्रतिष्ठानला जाहीर करण्यात आला आहे .चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी याबद्दल नुकतीच घोषणा केली आहे. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल अशी माहिती सतिश गुप्त दिली आहे . नंदकिशोर पालवे व सौ आरती पालवे यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा म्हटले तर देव केवळ देव्हाऱ्यातच नसतो तर तो माणसात असतो हि उक्ती अंमलात आणुन चालणारे नंदकिशोर पालवे व सौ आरती पालवे यांचा सेवासंकल्प हा प्रकल्प गेल्या ११ वर्षांपासून चालू आहे .अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्यांनी समाजातील मानसिक मनोरुग्ण , शारीरिक अपंग ,मतिमंद , बेघर यांच्यासाठी ते पळसखेड सारख्या छोट्या गावांमध्ये एक मार्ग चांगला प्रकल्प चालवत आहेत .बाबासाहेब आमटे यांनी चालू केलेल्या सामाजिक प्रकल्पाला आदर्श मानुन आणि संजय महाराज पाचपोर यांच्यासारख्या महान विभूतींच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प चांगल्या प्रकारे चालू आहे. या प्रकल्पास भेट दिल्यानंतर एक वेगळीच अनुभूती आपल्याला पाहायला मिळते.जीवन जगत असताना मोह मायेत सगळे गुंतलेले असताना एवढ्या लहान वयात हि संकल्पना करणे व ती अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी खूप मोठी ताकद लागते. अशक्यप्राय गोष्टीला शक्य करून नंदकिशोर पालवे व सौ आरती पालवे यांनी आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला आहे . त्यांच्या या कार्याचा गुणगौरव दि चिखली अर्बन बँक त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून करत आहे .दि चिखली अर्बन बँकेचे संस्थापक व सहकार , शिक्षण , शेती यांचे गाढे अभ्यासक स्व.भगवानदासजी गुप्त उपाख्य लालजी यांच्या जन्मशताब्दी वर्षात अशा सेवावृत्ती लोकांचा गुणगौरव करताना बँकेच्या संचालक मंडळाला अतिशय अभिमान वाटत आहे असे चिखली बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त म्हणाले . बँकेच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिनांक १३जुलै २०१९ रोजी सकाळी १० वाजता नंदकिशोर पालवे व सौ आरती पालवे यांना जीवन गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे .सन्मानचिन्ह ,मानपत्र , शाल श्रीफळ व १ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे .चिखली अर्बन बँकेच्या वतीने गेल्या १० वर्षापासून हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिला जातो. या पुरस्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी केली आहे. १३ जुलै २०१९ रोज शनिवार , सकाळी १० वाजता रानवारा रिसॉर्ट जाफ्राबाद रोड , चिखली येथे संपन्न होणार आहे....
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या