💥दि.चिखली अर्बन को-ऑप बँकेमध्ये जनता कमर्शिअल को-ऑप बँक विलीनीकरण...!


 💥कार्यारंभ सोहळा आज शनिवार दि.२७ जुलै रोजी खामगाव येथे थाटात संपन्न💥


 ✍ मोहन चौकेकर

दि.चिखली अर्बन को- ऑप बँकेमध्ये जनता कमर्शिअल को-ऑप बँक विलीनीकरण व कार्यारंभ सोहळा आज खामगाव येथे थाटात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरवात खामगाव शाखेत फीत सोडुन तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.मान्यवरांचे व मोठ्या संखेने उपस्थित ग्राहक, हितचिंतक  ,व्यापारी वर्गाचे विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने स्वागत केले या कार्यक्रमाला उपस्थित कामगार,विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्ग,विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री  मा.ना.डॉ.संजयजी कुटे  यांचे स्वागत बँकेचे अध्यक्ष मा  सतीशजी गुप्त यांनी केले.

भारतीय रिझर्व बँकेचे नागपूर विभागाचे महाप्रबंधक मा.जी.रमेश साहेब,ह.भ.प. संजयजी महाराज पाचपोर,खामगाव मतदार संघाचे  आमदार मा.आकाशजी फुंडकर,खामगाव जिल्हा संघचालक मा  महादेवराव भोजने,खामगाव तालुका संघचालक मा . बाळासाहेब काळे,खामगाव नगर संघचालक मा  नंदकुमारजी भट्टड,खामगाव नगरीच्या प्रथम नागरिक मा सौ अनिताताई डवरे,खामगाव नगर पालिकेचे उपाध्यक्ष मा  संजयजी पूरवार,मा . दिढे मामा यांचे यथोचित स्वागत व सत्कार चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष मा सतीशजी गुप्त यांनी केले.

या वेळी बँकेचे अध्यक्ष मा सतीशजी गुप्त यांनी मनोगत मांडतांना असे सांगितले कि ठेवीदाराचे हित हेच आमचे प्रथम कर्तव्य आम्ही विश्वस्त म्हणून काम करत असतांना गोरगरीब जनतेने बँकेवर विश्वास टाकून आपल्या कमाईतील पाई पाई बँकेत ठेवलेली असते आणि त्याचे रक्षण करणे आमचे प्रथम कर्तव्य आहे.आणि आता चिखली अर्बन बँकेने जनता बँकेच्या ठेवीदारांची जबाबदारी स्वीकारली आहे.त्यामुळे त्यांनी बिनधास्त बँकेत व्यवहार करावे.
मा आ आकाशजी फुंडकर यांनी सुद्धा बँकेत चांगल्या प्रकारे ग्राहकांनी व्यवहार करावे असे आवाहन खामगाव पंचक्रोशीतील जनतेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले.
रिझर्व बँकेचे नागपूर विभागाचे महाप्रबंधक मा  जी.रमेश साहेब यांनी बँकेला शुभेच्छा दिल्या विदर्भात बँक खूप चांगल्या प्रतीने काम करत आहे आणि यापुढे सुध्दा करेल अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
मा ना डॉ संजयजी कुटे यांनी  बँकेचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.गोरगरीब जनतेसाठी राष्ट्रीयकृत बँकापेक्षा सहकारी बँका खूप चांगले काम करत आहे असेही ते बोलले जसा सहकारी बँकांचा सेवाभाव आहे तसेच शासन सुद्धा सेवा भावी वृत्तीने काम करत आहे आणि सहकारी बँकांच्या पाठीशी शासन खंबीर उभे राहील अशी ग्वाही त्यांनी यावेले दिली.
यावेळी नांदुरा अर्बन बँकेचे अध्यक्ष मा  प्रल्हादजी भारंभे,चिखली नगर परिषेदेच्या अध्यक्षा मा सौ प्रियाताई बोंद्रे,जेष्ठ माजी संचालक मा  भाऊसाहेब लाहोटी,मा  विजुभाऊ कोठारी,मा  प्रेमराजजी भाला,शेगाव नगर संघचालक मा . शामभाऊ तेल्हारकर,शेगाव नगरीच्या प्रथम नागरिक मा सौ शंकुतलाताई बुच, बँकेचे संचालक मंडळ,अनेक पतसंस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक,पदाधिकारी ,खामगाव नगरीतील व्यापारी,प्रतिष्ठित नागरिक,माता भगिनी मोठ्या संखेने या विलीनीकरण व कार्यारंभ सोहळ्याला उपस्थित होते...

✍ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या