💥महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा बाळासाहेब थोरात यांनी केली निवड💥
परळी वैजनाथ/महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा बाळासाहेब थोरात साहेब यांनी जालना जिल्ह्याच्या निरीक्षक पदी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस मा प्रा टी पी मुंडे सर व काँग्रेसचे नेते माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा मतदारसंघनिहाय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा बाळासाहेब थोरात यांनी दोन निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत हे निरीक्षक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांचा अहवाल महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटी कडे पाठवणार आहेत
महाराष्ट्र मध्ये दि 29, 30 व 31 जुलै दरम्यान जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत जालना जिल्ह्यातील उमेदवारांच्या मुलाखती दि 31 जुलै रोजी घेण्यात येणार आहेत या मुलाखती घेतल्या नंतर इच्छुक उमेदवारांचा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडे पाठवण्यात येणार आहे तरी जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांची बैठक व मुलाखत दि 31 जुलैला घेण्यात येणार असे आवाहन करण्यात आले आहे....
0 टिप्पण्या