💥१ अॉगष्ट रोजी जलशक्ती जाणीव जागृतीसाठी सकाळी १०-३० वाजता प्रभातफेरीचे आयोजन💥
फुलचंद भगत
मंगरुळपीर-नगर परिषद अंतर्गत जल-शक्ती अभियान राबविण्यात येत आहे.या अनूषंगाने दि.१ आॅगष्ट रोजी जलशक्ती जाणीव जागृतीसाठी सकाळी १०-३० वाजता प्रभातफेरीचे आयोजन करन्यात आले आहे.
जलशक्ती अभियान अंतर्गत दि.१ जुलै ते १५ सप्टेबर या कालावधीमध्ये जनआंदोलनाच्या माध्यमातुन जलशक्ती ऊपक्रमाची अंमलबजावणी करन्यात येत आहे.जनतेमध्ये पाण्याचा योग्य,प्रकारे वापर,पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये जिरवणे, पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करने,वृक्ष लागवड करणे, असे विविध उपक्रम राबविवुन जनतेमध्ये जनजागृती व्हावी करिता प्रभातफेरीचे आयोजन दिनांक 1 ऑगस्ट 2019 रोजी, वेळ सकाळी 10:30 वा,नगर परिषद मंगरुळपिर येथून करण्यात आले आहे.या कार्यक्रमामध्ये सर्व जनतेंनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन न.प.मुख्याधिकारी मिलिंद दारोकार आणी सहा.प्रकल्प अधिकारी राहुल भगत तसेच नगर परिषद प्रशासनाडून करन्यात आले आहे.
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या