💥नांदेड जिल्हा कैकाडी समाज मित्र मंडळ गोवर्धनघाट परिसरात केले महाप्रसादाचे आयोजन💥
नांदेड/जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा परिसरात पावसाने दडी मारल्याने सर्वत्र हाहाकार माजला असून मागील पाच ते सहा वर्षापासून अत्यल्प वृष्टी होत असल्यामुळे भयावह दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाळा लागून जवळजवळ दोन महिण्याचा कालावधी उलटत असल्याने शेतकरी-शेतमजूर तसेच गोर-गरीब जनतेवर उपासमिरीची वेळ आल्याने देवाला साकडे घालत नांदेड जिल्हा कैकाडी समाज मित्र मंडळ व संपूर्ण कैकाडी समाजाच्या वतीने गोवर्धन घाट परिसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी या महाप्रसादाचा जनतेने मोठ्या प्रमाणात लाभ घेतला यावेळी कैकाडी समाज मित्र मंडळ व समस्त कैकाडी समाजाच्या वतीने मराठवाडयात पाणी पडावे दूष्काळ मूक्त मराठवाडा व्हावा म्हणून देवाची प्रार्थना ही करण्यात आली भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैकाडी समाज मित्र मंडळाचे युवा कार्यकर्ते अक्षय माने,राज माने,सुरेश जाधव,सुनील माने,सुभाष माने,हिरा जाधव,बंडू माने,बालाजी माने,बालू माने,नितीन माने,पप्पू माने,बालू जाधव,गणेश जाधव,किरण माने आदींसह समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले..
0 टिप्पण्या