💥सन्माननीय न्यायालयाने घेतली अवैध गुटखा विक्री विरोधात कठोर भुमिका गुटखा तस्करांचे धाबे दणानले💥
पुर्णा/पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.सुभाषराव राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यकठोर पो.उप.नि.चंद्रकांत पवार व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने दि.११ जुन २०१९ रोजी धाडसी कारवाई करीत लाखो रुपयांचा अवैध गुटख्याचा साठा जप्त केला होता या संदर्भात पुर्णा पोलिस स्थानकात गुरनं १८१/१९ कलम ३२८,२७२,२७३,१८८,१२०(ब) अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या अवैध गुटखा तस्करी व अवैध गुटखा प्रकरणात पो.उप.नि.चंद्रकांत पवार यांनी अत्यंत काटेकोर व सखोल तपास करुन अवैध गुटखा विक्रीची पालेमुळे खनून काढली होती या प्रकरणात किरकोळ गुटखा विक्रेत्यांसह जिल्ह्यातील ठोक विक्रेत्यांविरोधात प्रथमच मोठी कारवाई करण्यात येऊन सात आरोपींवर गुन्हें दाखल करण्यात आहे होते या प्रकरणी सखोल तपासात असे समोर आले होते की वजीर गुटखा पुड्यांचा जिल्ह्यातील प्रमुख डिलर संदिप लकडे हा असून तोच प्रकरणातील अन्य आरोपींसह जिल्ह्यातील असंख्य गुटखा विक्रेत्यांना गुटख्याचा माल पुरवतो त्यामुळे या अवैध गुटखा प्रकरणात पोलीस प्रशासनाने त्याला मुख्य आरोपी केले होते गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलीस प्रशासनाला हुलकावणी देत होता पोलिसांनी अटक करु नयें याकरिता त्याने पराभणी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता तपासातील प्रोग्रेस पाहून जिल्हा सत्र न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश श्री.बागूल साहेब यांनी अवैध गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप लाकडे याचा अटक पूर्व जमीनाचा अर्ज आज मंगळवार दि.१६ जुलै २०१९ रोजी नामंजूर केला आहे.तत्पुर्वी बोरी येथे ६० लाख रुपयांचा अवैध गुटखा पकडण्यात आला होता या प्रकरणात त्याला न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला होता पुर्णा येथील अवैध गुटखा प्रकरणातही आपणास न्यायालय अटकपूर्व जामीन देईल या उद्देशाने त्याने परभणी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला होता परंतु पुर्णा पोलीस प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे तपास केल्याने सन्माननीय न्यायालयाने त्याला जामीन नाकारल्याने पुर्णा पोलीस प्रशासन आरोपी संदिप लकडेचा आता कसुन शोध घेणार यात तिळमात्र शंका नाही....
0 टिप्पण्या