💥आखाड पार्टीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या महामेळाव्यात प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे💥
अकोले तालुक्यात घड्याळाच्या काट्यावर ‘कमळ ’ फुलणार हे पक्के ठरल्याने आमदार वैभव पिचड यांच्या पक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. शुक्रवारी अमृतसागर दूध संघाच्या सभागृहात तालुक्यातील प्रमुख नेते, कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीला रामराम करीत भाजपवासी होण्याचा सूर आळवला. बैठक संपताच कार्यकर्त्यांचे आपआपसात ‘जय श्रीराम’ सुरु झाले.अकोले तालुक्यातील सर्व खोऱ्यातील कार्यकर्त्यांची शुक्रवारी बैठक झाली. शनिवारच्या मेळाव्यात भाजप प्रवेशाची तारीख निश्चित केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार पिचड यांच्या पक्ष बदलाची चर्चा सुरु आहे. सुरुवातीला आ.पिचड शिवबंधनात अडकणार असा सूर होता. तालुक्यातील ज्येष्ठांनी सेनेपेक्षा मग राष्ट्रवादीच बरी असा धोशा पुढे केला. यावर जेष्ठ व तरुणाईचा मध्य साधत भाजपमध्ये प्रवेश केल्यास तालुक्यातील प्रलंबित विकास कामांना न्याय व गती मिळेल, असा मत प्रवाह पुढे आला.भाजपात जाण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला आहे. शनिवारी आखाड पार्टीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या होणार्या महामेळाव्यात त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे...
0 टिप्पण्या