💥आगळ्या वेगळ्या वाढदिवसाबद्दल नारायणराव धनवटे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे💥
गंगाखेड एकीकडे वाढदिवसाच्या निमित्ताने पाश्चिमात्य संस्कृती बोकाळत असताना दुसऱ्या बाजूला बालिकेने मात्र स्वतः आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून सैनिक कल्याण निधीला मदत करण्याची कल्पना मांडली. पालकांसह पालकांच्या मित्रांनी मिळून तिचा हा आगळावेगळा वाढदिवस साजरा केला.
वाघलगाव येथील सरपंच सौ. सीमाताई नारायणराव धनवटे यांची मुलगी मानसी हिचा गुरुवारी वाढदिवस होता. वर्गमैत्रिणी व शेजारचे वाढदिवसाची तयारी करत असताना मानसी मात्र आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात यावा यासाठी मागील चार-पाच दिवसांपासून मनातले मनात तयारी करत होती. वाढदिवसाचा दिवस उजाडताच तिने आपला वाढदिवसावर होणारा जो काही छोटा मोठा खर्च टाळून तो खर्च सैनिक कल्यान निधी देण्यात यावा अशी इच्छा प्रगट केली. मानसीच्या या मागणीस पालक नारायणराव धनवटे यांनी दुजोरा दिला. त्यानंतर गंगाखेड शहरातील वकील कॉलनीत आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संत जनाबाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य मधुकर घुगे ,धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर, अशोकरावजी गाढवे, मुंजाभाऊ लांडे, नवनाथ लोकरे, गोविंद कंधारकर, आव्हाड व मानसीचे पालक नारायणराव धनवटे आदींची उपस्थिती होती. वाढदिवसाच्या निमित्ताने तिला उपस्थितांनी शुभेच्छा देत असा वाढदिवस प्रत्येकाने साजरा करावा अशा भावना व्यक्त केल्या. आगळ्या वेगळ्या वाढदिवसाबद्दल नारायणराव धनवटे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे...
0 टिप्पण्या