💥पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा हिस्सा,जम्मू काश्मीर राज्याचा तो भाग असल्याने तो देशाला जोडणं आमच काम - प्रकाश जावडेकर
जम्मू काश्मीरमधून कलम 370हटवल्यानंतर केंद्र सरकारचं आता पुढचं पाऊल पाकव्याप्त काश्मीर घेणं आहे असं मोठं विधान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.कलम 370हटवल्यानंतर पाकिस्तान घाबरलं आहे म्हणूनच त्यांच्याकडून व्यापारी, राजकीय संबंध तोडण्यात आले. पाकव्याप्त काश्मीर हाभारताचा हिस्सा आहे. जम्मू काश्मीर राज्याचा तो भाग असल्याने तो देशाला जोडणं आमचं काम आहे असं प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे. इंदोर येथील भाजपा कार्यालयात जावडेकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू काश्मीर राज्याचा भाग असल्याने सध्या त्याठिकाणच्या विधानसभेच्या जागा रिक्त ठेवण्यात येतील. त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकारची नजर पाकव्याप्त काश्मीरवर राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे...
0 टिप्पण्या