💥वडोदरा शहरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून बाळाला वाचवणाऱ्या पोलिसांचे नाव गोविंद चावडा आहे💥
✍ मोहन चौकेकर
गुजरातमधील वडोदरा शहरात मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी साठल्याने मगरी शिरल्याच्याही घटना घडल्या आहेत.
शहरात पाणी साठल्याने पोलिसांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या बचाव कार्यादरम्यान पोलिसांनी एका लहान बाळाला टबमध्ये टाकून त्याला त्यातून सुरक्षितरित्या वाचवले.
आयपीएस शमशेर सिंह यांनी याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. बचावकार्यादरम्यान वाचवण्यात आलेले बाळ 45 दिवसांचे आहे.या बाळाला वाचवणाऱ्या पोलिसांचे नाव गोविंद चावडा असे आहे. गोविंद यांच्या मानेपर्यंत पाणी असतानाही त्यांनी त्या बाळाला वाचवण्याचे साहसी कार्य केले. त्यांच्या या साहसीवृत्तीचे अनेकांनी कौतुक केले आहे.
वडोदरामध्ये 31 जुलैपासून ते 1 ऑगस्टपर्यंत 24 तासात 499 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या