💥दैनिक न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खानने भारतावर लावले गंभीर आरोप💥
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी सरकारशी आता संवाद शक्य नाही असं सांगितलं आहे. अमेरिकेतील दैनिक न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खानने भारतावर गंभीर आरोप लावलेत. त्यांनी सांगितलं की, दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत त्यात लढाई झाली तर धोका वाढत जाईल. भारताकडून जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्यानंतरपाकिस्तानसैरभैर झालं आहे. इम्रान खान आणि त्यांचे मंत्रीही युद्धाची भाषा बोलत आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानने सांगितले की, आम्ही भारताशी चर्चा करण्याचा अनेकदा प्रयत्न केले. त्यात कोणतीही कसर ठेवली नाही. मात्र मला वाटतं की, भारताला आणि त्यांच्या पंतप्रधानांना अशाप्रकारचा कोणताही संवाद ठेवण्याची इच्छा दिसत नाही. त्यामुळे आता भारताशी चर्चा होणार नाही हे स्पष्ट आहे. यापुढे इम्रान खान यांनी सांगितले की, मी दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केले. पण जेव्हा पुन्हा मागे वळून पाहतो तेव्हा असं वाटतं की, शांतता आणि चर्चेसाठी मी करत असलेले प्रयत्न अयशस्वी ठरतायेत. माझ्या प्रयत्नांचा वापर त्यांनी काही लोकांना खूश करण्यासाठी केला. आता यामध्ये आम्ही जास्त काही करु शकत नाही. त्यामुळे दोन्ही अण्वस्त्र असणारे देशांमध्ये युद्धाचा धोका वाढत चालला आहे. इम्रान खानने ही मुलाखत इस्लामाबादच्या ऑफिसमधून दिली...
0 टिप्पण्या