💥संभाजी सेनेच्या खिचडी वाटप अभियानाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक💥
परभणी/जिल्हा संभाजी सेनेच्या वतीने दररोज जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्नांना विलाजासाठी घेऊन येणाऱ्या रुग्नांच्या नातेवाईकांसह रुग्नांना मोफत खिचडी वाटप अभियाचा अत्यंत कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात येत असून संभाजी सेनेच्या या खिचडी वाटप अभियानाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्न व रुग्नांच्या नातेवाईकांना दररोज संध्याकाळी वेळ ०६-०० ते ०६-३० वाजेच्या दरम्यान खिचडी वाटप हा उपक्रम संभाजी सेनेच्या वतीने सुरु करण्यात आला आहे.'मानव सेवा हिच इश्वर सेवा मानून' संभाजी सेनेच्या खिचडी वाटप करणाऱ्या स्वयंसेवक टिम मध्ये सेवा बजावणारे रामेश्वर शिंदे,अरुण पवार,सुधाकर सोळंके, शुभम हाके आणि संदीप देशमुख,विनय जिंतूरकर,अमोल कनकदंडे, हे आवर्जून उपस्थित राहून नित्य नियमीतपणे रुग्नांसह रुग्नांच्या नातेवाईकांना खिचडी वाटप करीत आहेत त्यांच्या या मानवतावादी सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे..
0 टिप्पण्या