💥शाहू यांनी श्री मधावश्रम स्वामी हायस्कूल लिंबा येथे वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा 💥
शहीद सरदार भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सतप्रितसिंघ शाहू यांचा वाढदिवस चर्चेचा विषय ठरला आहे दिनांक ५ ऑगस्ट रोजी फाउंडेशनचे अध्यक्ष सतप्रितसिंघ शाहू यांनी श्री मधावश्र म स्वामी हायस्कूल लिंबा येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला व सर्व विद्यार्थी शिक्षक, पालक यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या व त्यावेळेस फाउंडेशनचे अध्यक्ष सतप्रितसिंघ शाहू यांनी विद्यार्थी शिक्षक व पालक यांचे मन वेधीत करणारे शब्द त्यांनी सांगितले.
आपण निसर्गाकडून, समाजाकडून भरपूर गोष्टी घेत आहेत त्याकरिता आपणही निसर्गाला काही देणे आवश्यक आहे त्याकरिता माझा आहे वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्याचा निर्णय मी घेतला आहे व शाळेच्या विद्यार्थी पालक व मुख्याध्यापक दुगाने सर,नाईक सर,वडकर सर, खिल्लारे सर, भोसले सर कदम सर, विश्वास सर हरके सर, पारतकर सर, यांचे आभार व्यक्त केले व समाजासाठी त्यांनी १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०१९ दरम्यान जन्म झालेल्या मुलींना सुकन्या योजनेचे १००० रुपयाचे मोफत खाते खोलून देण्याचा मानस ठेवला आहे त्यांच्या या विचार श्रेणीची पूर्तता केली तितकीच कमीच आहे तसेच महालिंगेश्वर विद्यालय सोनपेठ व कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ येथे ग्रंथदान करते वेळेस त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ दानाचे महत्व सांगितले
सर्व विद्यार्थी व शिक्षकास दरवर्षी वाढदिवसानिमित्त १ वृक्ष, १ ग्रंथदान व समाज हितासाठी हे एक एक कार्य अवश्य करणे आणि तेथील विद्यार्थी शिक्षक यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या व सतप्रितसिंघ यांनी सर्व वाढदिवसा निमित्त केलेल्या कार्यक्रमाचं श्रेय न घेता हे तर माझे कर्तव्यच आहे अशी ग्वाही देऊन वाढदिवस साजरा केला आहे व त्यांच्या या कार्याने जगाला एक वेगळाच संदेश मिळत आहे की आपण या निसर्गाला व समाजाला देण्याचेही भागीदार आहोत त्यांच्या या अनमोल शब्दाची सोनपेठ नाहीतर संपूर्ण परभणी जिल्ह्यात चर्चा होत आहे...
0 टिप्पण्या