💥गुटखाबंदी कायद्यावर गुटखा तस्करांची लघुशंका,पोलीस प्रशासनाकडून कारवाई झाल्यास अन्याय केल्याचा डंका💥
💥गुटखा तस्करीतून मिळणाऱ्या अफाट कमाईतून गुटखा तस्कर 'चोर तर चोर पुन्हा शिरजोर'💥
परभणी/जिल्ह्यात सर्वत्र गुटखा तस्करांनी थैमान माजवल्याचे दिसत असुन गुटखाबंदी कायद्यावर खुलेआम लघूशंका करीत प्रशासनाला उघड आवाहन दिल्याचे पाहावयास मिळत आहे.जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीतून प्रतिरोज लाखों रुपयांची उलाढाल होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या कमाईतून मुजोर झालेले गुटखा तस्कर आता पोलीस प्रशासनालाही खुलेआम धडा शिकवण्याची चेतावणी देतांना पाहावयास मिळत आहेत तर जिल्ह्यात गुटखा बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याचा बनाव निर्माण करणाऱ्या अन्न व औषधी प्रशासनाचा भ्रष्ट कारभार चौव्हाट्यावर आल्याची घटना आज सोमवार दि.०५ अॉगष्ट रोजी उघडकीस आली असून शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) इमारतीच्या संरक्षण भिंती लगत राज्यात बंदी असलेल्या गोवा नामक गुटखा पुड्यांचा कवरचा साठा आतील गुटखा पुड्या काढून फेकलेल्या अवस्थेत नागरीक व संस्थेतील विद्यार्थ्यांना आढळून आल्याने अन्न व औषधी प्रशासनाच्या अकार्यक्षम कारभारा विरोधात संताप व्यक्त होत आहे.यावरुन असे निदर्शनास येते की औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आसपास गुटखा तस्कर व गुटखा विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्रीचे जाळे विनले असून या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना गुटख्याची लत लावली जात आहे.परभणी शहरात सध्या सर्वत्र गुटखा बंदी कायद्यांचे तीन तेरा वाजल्याचे दिसत असून शहरात प्रत्येक पान टपऱ्यां वर गुटखा बंदी कायद्यावर लघूशंका करीत गुटखा तस्कर व किरकोळ गुटखा विक्रेते राज्यात बंदी असलेला गुटखा हा डिस्प्ले लावून विकतांना पाहावयास मिळत आहेत.अवैध गुटखा तस्कर व गुटखा विक्रेत्यांनी अक्षरशः गुटखा बंदीकायदा हा धाब्यावर बसवल्याचे दिसत आहे.जिल्ह्यातील अन्न व औषधी प्रशासन विभाग जिल्ह्यातून भुमीगत झाले की काय ? असा प्रश्न निर्माण झाला असून अन्न व औषधी प्रशासनाचे भ्रष्ट अधिकारी एकीकडे एखादी थातुरमातुर करवाई करुन जिल्ह्यात गुटखा बंदी कायद्याची अंमलबजावणी झाल्याचे सोंग करीत आहेत तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने गुटखा तस्करांवर कठोर कारवाई केल्यास हरामच्या कमाईवर मुजोर झालेले राजकीय वरदहस्त प्राप्त गुटखा तस्कर पोलीस प्रशासनावर बेताल आरोप करीत पोलीस प्रशासनालाच धडा शिकवण्याची धमकी राजरोसपणे देतांना पाहावयास मिळत आहेत एकंदरीत गुटखा तस्करांचा कारभार 'चोर तर चोर पुन्हा शिरजोर' असाच झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
राज्य व केंद्र सरकार कडून कँन्सर सारख्या जिवघेण्या आजारा पासून नागरिकांना बचाव व्हावा याकरिता जाहिरातींवर व कँन्सर पिडितांच्या विलाजावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतांना मात्र जनसामान्यांच्या मतांवर निवडून येणारे सत्तेतील लोकप्रतिनिधी मात्र पोलीस प्रशासनावर गुटखा तस्करांच्या बचावासाठी राजकीय दडपशाहीचा वापरही करतांना पाहावयास मिळत आहे.जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करांवर कठोर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुजोर गुटखा तस्कर व गुटखा तस्करांच्या राजकीय पाठीराख्यांकडून होणाऱ्या मानसिक दडपना मुळे गुटखा तस्करी विरोधात सखोल तपास करणे ही अवघड जात असल्याचे वरीष्ट अधिकाऱ्यांनी संबंधित तपास अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून गुटखा तस्करांच्या मुस्क्या आवळने अत्यंत गरजेचे झाले आहे..
0 टिप्पण्या