💥तहसिलदार श्याम मदनूरकर यांनी लाभार्थ्यांना सरकार केंद्रावर मानधन योजनाचे कार्ड केले वाटप💥
पुर्णा/पंतप्रधान मानधन योजनेतील तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना तहसिलदार श्याम मंदनूरकर यांच्या हस्ते येथील आपले सरकार केंद्रावर मानधन योजनाचे कार्ड वाटप करण्यात आले. देशातील शेतकऱ्यां साठी वृद्धपकाळात आधार म्हणून केंद्र शासनाच्या वतीने नुकतीच पंतप्रधान किसान मानधन योजना सुरु करण्यात आली असून या योजनेचा शुभारंभ 9 ऑगस्ट पासून सुरू झाला असून तालुक्यातील हजारो शेतकरी या योजनेत समाविष्ट झाले आहेत आज शुक्रवारी ता 23 ऑगस्ट रोजी दुपारी तहसीलदार शाम मंदनूरकर याचा हस्ते शहरातील सिद्धीविनायक आपलं सरकार केंद्र येथे या योजनेत समाविष्ट झालेल्या शेतकऱ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले या वेळी त्यांनी बोलताना सांगितले कि, ही योजना 31ऑगस्ट पर्यत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यां साठी खुली असून आपलं सेवा केंद्रा वर या योजनेच्या लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी असेंआव्हान मंदनूरकर यांनी यावेळी केले उपस्थित
बालाजी अंबाजी कदम
दौलत शंकरराव इंगोले
विजय शिवाजीराव इंगोले
गजानन देविदासराव कराळे गजानन रामराव कदम आदी
शेतकऱ्याना त्यानी कार्डचे वाटप केले या वेळी सिद्धीविनायक आपले सरकार केंद्रसंचालक विनोद कदम यांची उपस्थिती होती...
0 टिप्पण्या