💥अवैध दारू विक्री विरोधात संतप्त महिलांनी गाठले पोलीस ठाणे...!



💥सेलू तालूक्यातील देऊळगाव गात येथील घटना,अवैधरीत्या देशी - विदेशी दारूची सर्रासपणे होत होती विक्री💥 


सेलू तालूक्यातील देऊळगाव गात येथे सर्रासपणे अवैध दारू विक्री होत असल्याने दारुड्याचा ञासाला वैतागलेल्या संतप्त महिलांनी शनिवारी दुपारी थेट सेलू पोलिस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षकांकडे ठाण माद्णून त्यांनी गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. तालुक्यातील देऊळगाव येथे अवैधरीत्या देशी - विदेशी दारूची सर्रासपणे विक्री केली जात आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तरूण व्यसनाधीन झाल्याने कुटुंबात कलह वाढत आहेत. तसेच मद्यपी दारू पिऊन महिलांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांनी ठराव घेऊन अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली होती. पंरतू येथील पोलीस कर्मचारी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कुठलीच कारवाई करत नाहीत. रोजच्या त्रासाला वैतागून येथील सुमारे दीडशे महिलांनी आज सेलू पोलिस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांची भेट घेऊन कैफियत मांडून अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. यावेळी लालसेनेचे जनरल सेक्रेटरी  अशोक उफाडे जिल्हाध्यक्ष दत्ता तांबे,  अंकुश तांबे, गोरख तांबे, अनिल तांबे, गोपाल कदम शिवराम कदम तसेच महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या