💥पावसाअभावी अर्जवट झालेली पेरणी व कर्ज वसुलीसाठी बँकेने पाठवलेली नोटीस शेतकऱ्याच्या आत्महत्येला ठरले कारण💥
पुर्णा/तालुक्यातील मौ.कानखेड शिवारातील ६५ वर्षीय वृध्द शेतकरी माणिकराव बाबाराव कोठारे या शेतकऱ्याने आज गुरुवार दि.२२ अॉगस्ट रोजी सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास आपल्या कानखेड शिवारातील शेतात असलेल्या लिंबाच्या झाडास गळ्यातील रुमालाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून मयत शेतकऱ्याचा मुलगा बाबाराव माणिकराव कोठारे यांनी दिलेल्या खबरी वरुन पुर्णा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यांनी दिलेल्या माहितीत असे नमूद करण्यात आले आहे की सद्या पाऊस पडत नसल्याने अर्धवट झालेली पेरणी आणी त्यातच बँकेने कर्जाची परतफेड करण्या संदर्भात नोटीस पाठवल्याचे कारणामुळे आता कर्ज फेडायचे कसे या काळजीमुळे मयत माणिकराव कोठारे यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र शासनाची फसवी कर्जमाफी आणी मागील पाच वर्षापासून होणारी अत्यल्प वृष्ठी यामुळे शेतकरी संपूर्णतः देशोधडीला लागला असतांना व याही वर्षी कमी प्रमाणात पाऊस होत असतांना ऐन दुष्काळी परिस्थितीत बँक प्रशासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या परतफेडी संदर्भात नोटीसा पाठवने अत्यंत घृणास्पद व गंभीर बाब असल्यामुळे संबंधित बँक प्रशासनालाही शेतकरी आत्महत्या प्रकरणात जवाबदार धरुन त्यांच्यावर गुन्हें दाखल करण्यात यायला हवे कारण परिस्थितीची कुठलीच जाणीव न ठेवता शेतकऱ्यांकडून कर्ज वसूली करणे हा प्रकार गंभीरच म्हणावा लागेल सदरील घटनेचा तपास पुर्णा पोलीस स्थानकाचे पो.नि.सुभाषराव राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.गंधकवाड हे करीत आहेत...
0 टिप्पण्या