कवी - रणजीत सी.(चौधरी दिनेश)
----------------------
सत्तेत असतांना अहंकाराच्या
मस्तीत वावरणाऱ्या पुढाऱ्यांना
आता कार्यकर्त्यांची किंमत
कळू लागली,कारण पक्षांतर
करणाऱ्या डोमकावळ्या
पुढाऱ्यांची संख्या आता
जोमाने वाढू लागली,
असंख्य उन्हाळ्यांना तोड
देत डोलदार झालेल्या
पिंपळाच्या वृक्षाची अवस्था
शेवटी जशी होते तशी
अवस्था काही राजकीय
पक्षांची बनू लागली,
उशीरा का होईना पक्ष
कार्यकर्त्यांची किंमत
अहंकारी राजकीय रावणांना
आता कळू लागली,
शेवटची घटीका मोजणारी
पापी आत्मे स्वतःच्या
पापांची पाढे पहा कशी
वाचू लागली...!
कवी - रणजीत सी.(चौधरी दिनेश)
0 टिप्पण्या