💥ना.संजय कुटे यांच्या हस्ते १६ कोटी रु.कामाचे भुमी पुजन💥
चिखली : स्वच्छ चिखली सुंदर चिखली चा ध्यास मनाशी बाळगुन विकासात्मक कार्य करण्यात अग्रेसर असलेल्या चिखली नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ.प्रियाताई कुणाल बोंन्द्रे यांनी शहरातील मुख्य मार्ग असलेल्या श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासुन बि.डी.सी.सी. बँक पर्यंतचा बऱ्याच वर्षांपासुन रखडलेला व शहर वासीयांना ये जा करण्यासाठी अत्यावष्यक असलेला मुख्य मार्ग तसेच श्री.छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते श्री.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंतचा रस्ता, कॉक्रेटींग करण, दुतर्फा नाली बांधकाम व सि.डी.वर्क चे भुमीपुजन सोहळा व ३३६ घरकुलांची बांधकाम परवानगी व चेक वाटप दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता स्थानीक मौनीबाबा संस्थान चिखली येथे आयोजीत केले आहे.
यावेळी ना.डॉ.संजय कुटे, (कामगार, इतर मागासवर्ग व शैक्षणीक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, वि.मागास प्रवर्ग कल्याण, महाराष्ट्र राज्य मंत्री तथा पालक मंत्री बुलडाणा जिल्हा) यांचे नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यमान नगराध्यक्षा सौ.प्रियाताई कुणाल बोन्द्रे, विशेष उपस्थिती ना.डॉ.संजय कुटे, यांचे सह ना.श्री.रंजीत पाटील (नगर विकास राज्यमंत्री महाराष्ट्र), ना.श्री.चैनसुख संचेती (आ.मलकापुर विधानसभा, अध्यक्ष विदर्भ वैधानिक विकास मंडळ), खा.प्रतापराव जाधव, विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर, आ.आकाश फुंडकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष धृपतराव सावळे, भाजपा युवा नेते कुणाल बोंन्द्रे हे राहणार आहेत.
शहरात विविध प्रभागांर्तगत अंतर्गत रस्त्यांचे काम सुरु असतांना शहरातील मुख्य रस्त्यांबाबत नियोजन बध्द रित्या आखणी करुन त्यासाठी आवष्यक असलेला निधी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.संजय कुटे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र नगर विकास राज्यमंत्री ना.रनजीत पाटील यांचे वतिने १६ कोटी रुपयांचा विकास निधी खेचुन आणुन शहरातील बसस्थानक परिसराला जोडणारा महत्वाच्या मार्गाचा प्रश्न कुशल नेतृत्वातने विद्यमान नगराध्यक्षा सौ.प्रियाताईंनी व भाजपचे युवा नेते माजी उपाध्यक्ष कुणाल बोंन्द्रे यांनी मार्गी लावला आहे. शहरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ३३६ घरकुलांची परवानगी मिळवुन देत सदर घरकुलांच्या बांधकामा बाबतच्या पहिल्या हᄍयाचे चेक वाटप या वेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते होणार आहे.
भाजपा युवा नेते कुणाल बोन्द्रे आणि भाजपा युवा आघाडी यांच्या विद्यमानाने संपन्न होणाया भुमीपुजन सोहळ्या प्रसंगी चिखली न.प.उपाध्यक्षा सौ. वज़ीराबी शेख अनिस, बांधकाम सभापती डॉ.प्रकाश शिंगणे, पाणी पुरवठा सभापती गोपाल देव्हडे, शिक्षण सभापती गोविंद देव्हडे, आरोग्य सभापती नामदेव गुरुदासाणी, महिला व बालकल्याण सभापती मंगलाताई झगडे, गट नेते राजु गवई, सुदर्शन खरात, नगरसेविका डॉ. मिनल गावंडे, सौ.ममता बाहेती, सौ.रेवती कुळकर्णी, सौ.विमलताई देव्हडे, सौ.अर्चना खबुतरे, सौ.लक्ष्मीबाई अतार, सौ.सुनिता शिंगणे, नगर सेवक विजय नकवाल, गुरुदत्त सुसर, पंडीतराव देशमुख अनुप महाजन यांची उपास्थिती लाभणार आहे. तरी नागरीकांसह बहुसंख्य कामगार बंधु भगीनी यांनी या कार्यक्रकास आवार्जुन उपस्थित राहुन मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा शहर युवा आघाडीच्या वतिने करण्यात आले आहे...
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या