💥मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ💥
फुलचंद भगत
वाशिम-दि. २३/०८/२०१९
जिल्हा परिषद वाशिम च्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ चा शुभारंभ करण्यात आला. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या हस्ते दि २३ रोजी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ चा शुभारंभ करण्यात आला.
गावात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकच-याचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षणाबाबत सर्व गावामध्ये तयारी करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले. तसेच यावेळी दुसऱ्या टप्प्यातील ओडीएफ पडताळणी प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्राथमिक पडताळणी समिती गठीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या. प्राथमिक पडताळणी समितीने पडताळणी केल्यानंतर फेरपडताळणी समिती ग्रामपंचायतींची करणार आहे. प्राथमिक पडताळणी तपासणी समितीने गावस्तरावर कशाप्रकारे पडताळणी करायची आहे. तसेच प्राथमिक पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणजेच विस्तार अधिकारी पंचायत हे पडताळणी प्रक्रिया चालू असताना सनियंत्रण करणार आहेत याबाबत उप मूख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी माहिती दिली. शासन निर्णयानुसार प्राथमिक पडताळणी तपासणी समिती मध्ये केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, संबंधित ग्रामपंचायती मधील एक अंगणवाडी सेविका, एक मुख्याध्यापक अथवा त्यांचे प्रतिनिधी, एक स्वच्छाग्रही, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, आशा सेविका, महिला बचत गटाच्या एक सदस्या, जलसुरक्षक, इ. पैकी सहा सदस्य असतील याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह विभाग प्रमुख आणि सर्व गट विकास अधिकारी यांची ऊपस्थिती होती.
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या