💥प्रत्येकानी केली पुरग्रस्तांना आपआपल्या परीने भरगोस मदत💥
पुर्णा/तालुक्यातील अवघे पाच हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या मौ.गौर येथील ग्रामस्थांनी मानुसकीची भावना जोपासत कोल्हापूर-सांगली येथील पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला असुन गावातील सर्व धर्मिय ग्रामस्थानी एकत्रितपणे येऊन तालुक्यात सर्वात प्रथम पुरग्रस्तांना मदत देण्याचा मान मिळवला आहे.
गौर या गावातून पुरग्रस्तासाठी मोलाची मदत म्हणून जवळपास 10 क्विंटल तांदूळ,5 क्विंटल गहू, 200 साड्या, पारले बिस्कीटचे 10 बॉक्स,8000 रु रोख रक्कम,कपडे आदी मदत गावकऱ्यांच्या वतीने पुरग्रस्तांना पाठवण्यात आली आहे.पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गौर गावातील प्रत्येक नागरिक धावून आल्याचे आज पाहावयास मिळाले अशाच स्वरूपात प्रत्येक नागरीकाने पुरग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच पुरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळेल असे यावेळी गावातील जेष्ठ नागरीकांनी बोलून दाखवले..
0 टिप्पण्या