💥वाहनात पाच गोवंश तसेच कत्तलीसाठी वापरले जाणारे धारदार शस्त्र देखील वाहनामध्ये आढळून आले💥
कळमनुरी शहरातून कत्तलीसाठी जाणारे गोवंशाचे वाहन हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या वाहनात धारदार शस्त्रास्त्रे देखील आढळून आले असून पाच गोवंशाचे जीव या कार्यकर्त्यांमुळे वाचले आहेत. विशेष म्हणजे सकाळी साडे सात वाजता घटना घडून देखील सायंकाळी पाच वाजेपर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. कळमनुरी येथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गोवंशाची तस्करी करणारे वाहन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, सदरील वाहन चालकाने भरधाव वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर कार्यकर्त्यांनी पाठलाग करुन हे वाहन अडविले. एम.एच. ३८ एक्स ००४७ या कार्यक्रमांकाच्या मालवाहु टेंम्पोतून सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथून नांदेड जिल्ह्यातील अर्धापुरकडे बकरी ईदच्या कत्तलीसाठी हे गोवंश घेऊन जात असल्याचे सदरच्या वाहन चालकाने कार्यकर्त्यांना सांगितले. या वाहनात क्रूरपणे पाच गोवंश कांबले होते. तसेच कत्तलीसाठी वापरले जाणारे धारदार शस्त्र देखील वाहनामध्ये आढळून आले. सकाळी सात वाजता ही घटना घडल्यावर देखील पोलिसांनी अतिशय संथ गतीने गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरुच ठेवली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नाही.कळमनुरी येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवा शिंदे, अंकुश पाटील, कुणाल खर्जुले, अमोल दिपके, हरीष भोसले, योगेश संगेकर, भागवतठाकुर, गोपाल काकडे यांनी संबंधीत आरोपींविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविण्याची मागणी पोलिसांकडे केली....
0 टिप्पण्या