💥अर्थव्यवस्थेत आलेली सुस्ती आणि शेती क्षेत्राच्या होत असलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय💥
देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने खूशखबर दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्थव्यवस्थेत आलेली सुस्ती आणि शेती क्षेत्राच्या होत असलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी अनुदान देण्याची घोषणा केली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.
''ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने साखरेच्या निर्यातीवर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एकूण 60 लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीवर हे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपये खर्च येईल,''असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले..
0 टिप्पण्या