💥पो.नि.सुभाषराव राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागातून झाले शिस्तबद्ध पथसंचलन💥
पुर्णा/शहरात आज सकाळी १०-१५ ते ११-३० वाजेच्या सुमारास पुर्णा पोलीस प्रशासनाच्या वतीने बकरी ईद पोळा व साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पो.नि.श्री.सुभाषराव राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिस्तबद्ध पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते.
पुर्णा पोलीस स्थानकातून शिस्तबद्ध पथसंचलनास सुरुवात झाली शहरातील दयानंद चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,सराफा बाजार,स.भगतसिंघ चौक,छत्रपती शिवाजी महाराज नगर(मराठगल्ली) साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे नगर,कुंभार गल्ली,कुरेशी मोहल्ला डोबी गल्ली ते मुख्य बाजारपेठ,महात्मा बसवेश्वर चौक आदींसह विविध चौक व मार्गांवरुन अत्यंत शिस्तबद्ध निघालेले पोलीस पथसंचलन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पोलीस स्थानकात पोहोचल्या नंतर कायदा व सुव्यवस्थे संदर्भात पो.नि.सुभाषराव राठौड यांनी सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.या पोलीस पथसंचलनात पो.नि.सुभाषराव राठौड,सपोनि.प्रविण धुमाळ,सपोनि.सुनील माने,सपोनि.दिनकर,सपोनि.देवकते,पो.उपनिरिक्षक चंद्रकांत पवार,पो.उपनिरिक्षक मारोती चव्हाण आदी अधिकाऱ्यांसह तब्बल १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता,पोलीस प्रशासनाच्या या शिस्तबद्ध पथसंचलनाने जनसामान्यांना असा संदेश दिला की पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव तत्पर असून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांची यापुढे कुठलाही प्रकारची गय केली जाणार नाही..
0 टिप्पण्या