💥मुस्लीम बांधवांनी ईदच्या नमाज नंतर राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून जमा केला मदत निधी💥
पूर्णा/शहरातील ईदगाह मैदानावर सोमवार दि.१२ अॉगष्ट रोजी सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास येथील सर्वण मुस्लिम बांधवांनी एकत्रित होऊन ईद-उल-अझाची नमाज पठण करून उत्साहपूर्ण वातावरणात एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी जामा मशीदचे पेश-ईमाम शमीम अहेमद रिजवी साहब यांनी राज्यातील विविध ठिकाणी नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या नागरिकांसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांच्या मदतीसाठी मदत निधी जमा करण्याचे आव्हान केल्याने उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांनी आपल्या पेश-इमामच्या आव्हानाला प्रतिसाद देत एकूण ३७ हजार ७० रुपये मदत निधी जमा केला.
मुस्लीम बांधवांचा आज बकर-ईद सण असल्याने या सणा निमित्ताने सकाळी ०८:१५ वाजल्याच्या सुमारास शहरासह तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधव येथील ईदगाह मैदानावर जमा झाले व अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ईद-उल-अझा ची नमाज पेश-ईमाम हाफिज शमीम अहेमद रिजवी यांच्या मागे पठण केली. राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा आदी पूरग्रस्त भागातीलअसह्य नागरिकांच्या मदतीसाठी नमाज पठण केल्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपआपल्या परीने मदत निधी जमा केल्याने एकूण ३७ हजार ७० रुपये जमा झाले.उद्या दि.१३ ऑगस्ट रोजी जमा झालेला मदत निधी मुस्लीम बांधव पुर्णा तहसिलचे तहसीलदार शाम मदनूरकर यांच्या मार्फत पुरग्रस्तांच्या मदती साठी पाठवणार आहेत.यावेळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार श्री कोकाटे,पो.नि.सुभाषराव राठोड,सामाजिक नेते श्री. खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पो.नि.राठोड सहकारी अधिकारी सपोनि.प्रवीण धुमाळ, पो उप नि चंद्रकांत पवार,नागरगोजे यांनी चोख बंदोबस्त बजावला..
0 टिप्पण्या