💥आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट,पोलीस तपास सुरु💥
नांदेड/येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत व जुने सहकारी असलेले संभाजी गोविंदराव जाधव यांनी आज मंगळवार दि.२७ अॉगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या तरोडा नाका परिसरातील राजेश नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस स्थानकाचे पो.नि.अनिरुध्द काकडे यांच्या नेतृत्वाखाली पो.उप.नि.एम.एन.दळवी,पो.ना.श्रीरामे,हवालदार केंद्रे, यांचे पथक तात्काळ घटनास्थळावर रवाना झाले यावेळी त्यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे.मयत संभाजी जाधव यांच्या आत्महत्येला नेमके काय कारण असावे याचा तपास पोलीस करीत असून त्यांनी आत्महत्या केली की त्यांना कोणी आत्महत्या करण्यास मजबूर केले या संदर्भात ही तपास होणे अत्यंत आवश्यक असल्याचे जनसामान्यांतून मत व्यक्त होत असून त्यांच्या आत्महत्येचे वृत्त शहरात पसरताच मनसे कार्यकर्त्यांसह त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली..
💥नांदेड जिल्ह्यातील मनसेचा वाघ हरपला - गोविंद उर्फ राज ठाकर मनसे शहर प्रमुख पुर्णा
👏भावपुर्ण श्रद्धांजली 👏
विद्यार्थी दशेपासून मनसे प्रमुख राज ठाकरे साहेबांच्या राजकीय जीवनप्रवासात आजतागायत साथ देणारा एकनिष्ठ राजसमर्थक,निकटवर्तीय सहकारी,नांदेड जिल्हा मनसेचा बुलंद आवाज जिल्हाध्यक्ष संभाजीदादा जाधव यांचे आज सकाळी सुमारे ०५.०० वाजता दुःखद निधन झाले. दादांचे हे अचानक जाणे मनाला चटका लावून जाणार आहे. सामान्य कार्यकर्त्यांपासून नेता घडविणाऱ्या या राजकीय शिल्पकारांच्या आठवणी न विसरणाऱ्या आहेत. राजकीय जीवनात अमूल्य मार्गदर्शन करणाऱ्या अभ्यासू आणि दिग्गज मार्गदर्शकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करुण मी त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पन करतो असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुर्णेचे शहर प्रमुख गोविंद उर्फ राज ठाकर यांनी म्हटले आहे..
#भावपूर्ण_श्रद्धांजली.. 💐💐💐
0 टिप्पण्या