@किसनराव भोसले,सखाराम बोबडे यांचा पुढाकार@
गंगाखेड/कामगार नोंदणीच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक सह्या करीत नसल्याने वैतागलेल्या कामगारांनी गंगाखेड पंचायत समितीच्या कार्यालयात शनिवारी खुर्च्या फेको आंदोलन केले. जि प सदस्य किसनराव भोसले, सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात बांधकाम कामगार व इतर कामगारांची नोंदणी सुरू आहे. या नोंदणीसाठी ग्रामीण भागातील कामगारांना ग्रामसेवकाच्या सही, शिक्का असलेले व प्रमाणित केलेले प्रमाणपत्र आणावे अशी अट ठेवण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसांपासून ग्रामीण भागातील कामगार हे ग्रामसेवकाचे कार्यालय व पंचायत समितीत या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी साठी चकरा मारत होते.
ग्रामसेवक संघटनांनी मात्र कामगारांच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात काल शुक्रवारी जि प सदस्य किशन भोसले यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट देऊन गाऱ्हाणे मांडले. तर धनगर साम्राज्य सेनेचे सखाराम बोबडे पडेगावकऱ यांनी कामगारांसह जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष यांची भेट घेत कामगार नोंदणी प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांना सह्या करण्यासाठी आदेशित करावे अशी लेखी मागणी केली . शुकवारी उशिरा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले असून त्यात ग्रामसेवकांनी कामगाराकडून काही लेखी घेऊन, हमीपत्र घेऊन कामगार पमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याची आदेशित केले. पण आज शनिवारी सकाळी पंचायत समिती कार्यालय उघडताच उपस्थित असलेल्या ग्रामसेवकांनी मात्र त्यावर सह्या करण्यास नकार दिला. जि प सदस्य किशनराव भोसले, सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आज सकाळी सभापती सारीकाताई पोले, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांची भेट घेऊन कामगारांच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांना सह्या करण्यासाठी आदेशित करावे अशी विनंती केली होती. दुपारी तीन वाजता आले तरी ग्रामसेवक सह्या करण्यास तयार नसल्याने आंदोलन कर्त्याचा संताप अनावर झाला. यात सभापती व गटविकास अधिकारी कार्यालयातील खुर्च्या फेकण्यात आल्या .त्यानंतर तात्काळ पोलीस आणि प्रसिद्धीमाध्यमांनी पंचायत समितीकडे धाव घेतली .सायंकाळी उशिरा सुरडकर यांनी नोंदणीक्रत कामगारांचे पुनर नोंदणी करण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांना स्पॉटवर जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले. आंदोलनस्थळी बघ्यांची गर्दी जमली होती...
0 टिप्पण्या