💥चुडावा पोलीस स्थानकात २ आरोपीं विरोधात गुन्हा दाखल💥
पूर्णा तालुक्यातील येथिल प्रा.आ.केंद्र कंठेश्वर येथे एका आरोग्य सेवकास मारहाण करून तेथिल साहीत्याची तोडफोड करणाऱ्या दोघां विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
कंठेश्वर येथील प्रा.आ.केंद्रात ४२ वर्षीय अंकुश नारायण पदलवार हे आरोग्य सेविक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी२१ रोजी सायं ५ वाजेच्या सुमारास आपले काम करीत असताना कंठेश्वर येथिल आरोपी गोविंद लिंबाजी कदम व त्याचा मुलगा संदिप गोविंद कदम हे येथिल आरोग्य केंद्रात दाखल झाले.आरोग्य सेवक पदलवार यांच्याशी दोन्ही आरोपींनी
आश्लील भाषेत शिवीगाळ केली, थाफडबुक्क्यांनी मारहाण केली.व येथिल आरोग्य केंद्रातील साहीत्याची तोडफोड करुन शासकीय मालमत्तेचे ३ हजार रुपयांचे नुकसान केले अशी तक्रार नारायण पदलवार यांनी चुडावा पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून दि.,२२ रोजी दोघां विरोधात कलम ३५३,३३२, २९४, ४२७,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि विशाल बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मारोती चव्हाण हे करित आहेत....
0 टिप्पण्या