💥लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्ताने कष्टकऱ्यांचा भव्य मेळाव्याचे आयोजन💥
✍ मोहन चौकेकर
चिखली : जगविख्यात संयुक्त
महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत, थोर साहित्यिक, कवीकलावंत,
प्रबोधनकार व समाज सुधारक लोकशाहीर,साहीत्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 99 जयंतीउत्सवाच्या औचित्याने शोषित वंचित घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा शालेय साहित्य वाटप तसेच कष्टकऱ्यांचा भव्य
मेळाव्याचे आयोजन दिनांक 04 ऑगस्ट रविवार रोजी सकाळी 11 वाजता चिखली स्थानिक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
समस्त समाजबांधवांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेशआप्पा खबुतरे , तर उद्घाटक दैनिक आम्ही चिखलीकरचे कार्यकारी संपादक तथाविधीज्ञ जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा ॲड. गुणवंत नाटेकर असणार आहे. प्रमुख मार्गदर्शन चिखलीपोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार गुलाबराव वाघ वमाजी न्यायधीश सुरेश घोरपडे करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिखली कृषी बाजार समिती संचालक काशीनाथ आप्पा बोंद्रे,शिवसेना नेते नरेंद्र खेडेकर ,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर चेके पाटील, भाजपा नेते डॉ. प्रतापसिंग राजपूत ,रामदेव इंडियनचे संचालक शैलेश बाहेती,शिवसेना बुलढाणा जिल्हा सहप्रमुख भास्करराव मोरे,मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गजानन पवार ,वंचित आघाडीचे नेते भाईजान उबेद अली खान ,हाजी निसार सेठ ,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे , वकील संघाचे अध्यक्ष एड. सलीम शेख ,नगरसेवक दिपक खरात, सुदर्शन खरात,राजेशजी चांडक ,चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल तुपकर ,कैलास गाडेकर ,गजानन तारू, सरपंच सुमनबाई बोरकर,युवा स्वाभिमानशहराध्यक्ष पवन चव्हाण , समतादूत मोहसीन खान ,सुशीलकुमार जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून विशेष उपस्थिती म्हणून समाजातील गणमान्य मान्यवर राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन उज्वला फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ .प्रतिभाताई कांबळे, संपादक भाई छोटू कांबळे ,दिलीप काळे यांनी केले आहे....
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या