💥जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी दिलेला शब्द पाळला,आज विकासकामांचा केला जोरदार शुभारंभ💥
परभणी/जिल्ह्यातील पुर्णा-पालम-गंगाखेड विधानसभा मतदार संघाच्या विकासात्मक वाटचालीला सुरुवात झाल्याचे दिसत असून शिवसेनेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी लोकसभा निवडणूक काळात दिलेल्या संपूर्ण मतदार संघाच्या विकासाच्या वचनाच्या वचनपुर्तीला जिल्ह्याचे एकवचनी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी जोरदार सुरुवात केली असून शिवसेना दिलेल्या वचनांना जागत वचन पूर्तता करते व दिलेला शब्द पाळते हे त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी दाखवून दिले आहे.
आज गुरुवार दि.२९ अॉगस्ट रोजी गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पुर्णा तालुक्यात असलेल्या मौ.निळा या गावात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री मा.ना.दादाजी भुसे यांच्या विशेष निधीतून ग्रामविकास कार्यक्रम 2019-20 (2515) या योजने अंतर्गत सभामंडप 10 लक्ष रुपये व हायमास्टलाईट 10 लक्ष रुपये,नालीरस्ते 20 लक्ष रुपये अशा 40 लक्ष रुपयांच्या विविध कामाचे उद्घाघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी सरपंच बुद्धे,मा.सरपंच रमेश सूर्यवंशी,युवासेना उपजिल्हा प्रमुख माणिकराव सूर्यवंशी,संतोष सूर्यवंशी,पुर्णेचे शिवसेना शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम शिवसेना पदाधिकारी आणि समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात सहभाग नोंदवला तसेच गावातील जिल्हापरिषद शाळेला भेट दिली त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले तसेच त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व डिजिटल उपक्रमांची माहिती घेऊन पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवादही साधला त्याक्षणी शिक्षकवर्ग व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या