💥भुमीपुजन सोहळ्यात सौ.प्रिंयाताई बोंन्द्रें नी मांडला ३ वर्षांचा विकासात्मक लेखाजोखा💥
✍ मोहन चौकेकर
चिखली : जनतेच्या निवडीतुन नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या विद्यमान नगराध्यक्षा सौ.प्रियाताई कुणाल बोंन्द्रे यांनी आपल्या कल्पक व नियोजनबध्द कार्यशैलीने मागील ३ वर्षात जनतेच्या विश्वासास पात्र ठरत विकासात्मक कार्याची घोडदौड सुरु केली आहे त्यांच्या या धडपडीला विकास निधी रुपक कवच कुंडलांचा दान आपण आपल्या अथक प्रयत्नातुन वेळोवेळी मिळवुन देत आलो आहोत. महिला नगराध्यक्षा म्हणुण त्यांची कारकीर्द यशस्वीकडे वाटचाल करीत आहे. त्यांचे कार्य निश्चितच गौरवास्पद आहे असे भावउद्गार कामगार, इतर मागासवर्ग व शैक्षणीक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, वि.मागास प्रवर्ग कल्याण, महाराष्ट्र राज्य मंत्री तथा पालक मंत्री बुलडाणा जिल्हा मा.ना.डॉ.संजय कुटे यांनी आज दि.११ ऑगस्ट रोजी मौनीबाबा संस्थान येथे आयोजीत भुमीपुजन सोहळा, घरकुल चेक वाटप व नागरी सत्कार सोहळ्या प्रसंगी काढले.
या वेळी बोलतांना ना.डॉ.संजय कुटे म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्यमशिल व्यक्तीमत्वाचे धनी मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या शब्दा प्रमाणे चिखली शहरातील विकास कामासाठी विविध विभाग निहाय निधी उपलब्ध करुन देत स्वच्छ चिखली सुंदर चिखली चा आपला ध्यास पुर्ण होण्याच्या दिशेने सकारात्मक पावले उचललेली आहे. या पार्श्वभुमीवर आपणही गुणवत्तापुर्वक पध्दतीने विकास कामे होतील या कडे लक्ष देवुन नागरीकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासास आपण पात्र ठरावे तसेच विद्यमान पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नदी जोड प्रकल्पाच्या धर्तीवर धरणजोड (ग्रीड) प्रकल्प उभारुन शहरासह ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती थांबविण्या साठी लवकरच योजनेची सुरवात करणार आहे. याच बरोबर न.प.प्रशासनानेही काटेकोर आणि नियोजन बध्दरित्या प्रस्ताव सादर करुन विभाग निहाय विविध कामांची परीपुर्ती करावी अन्यथा वेळ प्रसंगी नागरीकांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागेल असा विधायक सल्लाही दिला. सद्या न.प.प्रांगणात कामगार नोंदणीसाठी कामगारांची वर्दळ पाहवयास मिळते. कामगारांच्या नोंदणी बाबत ते बोलतांना म्हणाले की कामगार या व्याख्येत सुमारे ४२ प्रकारच्या कामगारांचा समावेश होतो तेंव्हा त्या त्या प्रकारांच्या कामगारांची नोंदणी करावी.
स्थानीक मौनीबाबा संस्थान परिसरात आयोजीत या सोहळ्या प्रसंगी उपस्थित असलेले जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, जिल्ह्यातील १३ न.प.अध्यक्षांच्या तुलनेत चिखली न.प.अध्यक्षा सौ.प्रियाताई कुणाल बोंन्द्रे यांच्या कार्यकाळात शहरातील घरकुलांचा प्रश्न, अंतर्गत रस्ते व मुख्य मार्गाचा प्रश्न पुर्नत्वास जात आहे. पंतप्रधानांच्या स्वपनातील अच्छेदिन चिखली नगरीत पाहवयास मिळत आहे ही निश्चितच अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल. या प्रसंगी भाजपा जिल्हाअध्यक्ष धृपतराव सावळे म्हणाले की, भाजपा च्या विद्यमान नगराध्यक्षा सौ.प्रियाताई कुणाल बोंन्द्रे यांनी पक्ष निहाय विकास कामांबाबत अत्यंत प्रामाणीक पणे कार्य केले आहे. शहरात सुमारे ११५० घरकुलांच्या मान्यतेस प्राधान्य देवुन पक्षाच्या विश्वासास त्या पात्र ठरल्या आहेत. विशेष उपस्थितीत असलेले चिखली अर्बन चे अध्यक्ष सतिष गुᄍा म्हणाले की, पक्षाने टाकलेली जबाबदारी आणि चिखली शहराच्या नागरीकांचा विश्वास नगराध्यक्षा सौ.प्रियाताई कुणाल बोंन्द्रे यांनी अल्पावधीतच पुर्णत्वास नेला आहे त्यांचे नियोजनबध्द कार्य निाीतच कौतुकास पात्र ठरते आहे. आगामी काळात त्यांच्या हातुन शहराच्या विकासा बाबत महत्वपुर्ण कामे घडतील याची शाश्वती वाटते आहे. या नंतर चिखली नगरीच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ.प्रियाताई कुणाल बोन्द्रे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, माझ्या कार्यकाळात भाजपातील सर्व जेष्ठ मान्यवरांचे महत्वपुर्ण सहकार्य मला वेळोवेळी मिळत असल्याने मी शहरातील विकास कामांची परिपुर्ती करीत आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलांचा प्रश्न असो की अंतर्गत रस्त्यांसह मुख्य मार्गाचा प्रश्न, न.प. प्रशासनाला विश्वासात घेवुन सर्वांच्या सहकार्याने सोडविण्यासाठी सदैव कार्यतत्पर आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अच्छेदिन चा ध्यासच स्वच्छ चिखली सुंदर चिखली चा संकल्प पुर्ण करण्यास कारनीभुत होत आहे जनतेच्या सहकार्याची मी आशा बाळगते.
या भुमीपुजन सोहळ्या प्रसंगी चिखली महाराष्ट्र प्रदेश सदस्य सुरेश आप्पा खबुतरे, भाजपा उपाध्यक्ष प्रतापसिंह राजपुत, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाशबुवा जवंजाळ, बुलडाणा जिल्हा महिला व बालकल्याण सभापती सौ.श्वेताताई महाले पाटील, भाजपाचे संजय चेके पाटील, युवा नेते कुणाल बोन्द्रे, माजी आ.कायंदे, क्रिडा भारतीचे राजु व्यास, शहर अध्यक्ष सुरेंद्र पांडे, शेख अनिस शेख बुढन, बारा बलुतेदार महासंघाचे सतिष शिंदे, सलीम परवेज़, आनंदराव हिवाळे, श्रीरंग पीतळे, डॉ.निलेश गावंडे,अजय बिडवे, भास्करराव मोरे, निलेश अंजनकर, कपील खेडेकर,चिाखली न.प.उपाध्यक्षा सौ. वज़ीराबी शेख अनिस, बांधकाम सभापती डॉ.प्रकाश शिंगणे, पाणी पुरवठा सभापती गोपाल देव्हडे, शिक्षण सभापती गोविंद देव्हडे, आरोग्य सभापती नामदेव गुरुदासाणी, महिला व बालकल्याण सभापती मंगलाताई झगडे, गट नेते राजु गवई, सुदर्शन खरात, नगरसेविका डॉ. मिनल गावंडे, सौ.ममता बाहेती, सौ.रेवती कुळकर्णी, सौ.विमलताई देव्हडे, सौ.प्रभावती मुकुंद ऐकडे, सौ.अर्चना खबुतरे, सौ.लक्ष्मीबाई अतार, सौ.सुनिता शिंगणे, नगर सेवक विजय नकवाल, गुरुदत्त सुसर, पंडीतराव देशमुख अनुप महाजन गोविंद गिनोडे, शितलसेठ गुरुदासानी, वासु सेठ, इरतकर सर, संजय वाकोडे, योगेश सावंत, जय बोंन्द्रे, प्रविन राजपुत यांच्या सह शहरातील नागरीक व कामगार बांधवांची मोठया संख्येने उपास्थिती होती. या भुमीपुजन सोहळ्याचे सुसुत्र सुत्रसंचलन गणेश धुंदळे यांनी तर आभार प्रदर्शन सुभाष अप्पा मंगरुळकर यांनी केले. कायक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा युवा आघाडीचे कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले...
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या