💥सोन्याने आजवरच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला💥
✍ मोहन चौकेकर
नवी दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात १,११३ रुपयांची वाढ होऊन प्रति १० ग्रॅमसाठी सोन्याच्या दराने ३७,९२० रुपये या आजवरच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध भडकण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात तेजी नोंदवल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर सायंकाळी सातच्या सुमारास पुण्यात आणि मुंबईत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी अनुक्रमे ३८,६०० रुपयांवर आणि ३७,०४२ रुपयांपर्यंत उसळला...
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या