💥३ गुटखा तस्कर गुटखा विक्रेत्यांकडून १,२३,८८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त २ आरोपी अटक १ फरार💥
पुर्णा/पोलीस स्थानकाचे पो.नि.सुभाषराव राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.उप.नि.चंद्रकांत पवार,पोहेकॉ.विनोद रत्ने यांच्या पथकाने अवैध गुटखा तस्कर व अवैध गुटखा विक्रेत्यां विरोधात धाडसी मोहीम राबवली असून दि.०९ सप्टेंबर २०१९ रोजी ०४-२० वाजेच्या सुमारास मोटार सायकल वरुन गुटखा तस्करी करणाऱ्या अवैध विषारी गुटखा तस्करांना मौ.कौडगाव पाटी जवळून ताब्यात घेतले तर दुसऱ्या कारवाईत सायं.०७-४५ वाजेच्या सुमारास एरंडेश्वर येथील अवैध गुटखा विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून अवैध विषारी गुटखा पथकाने जप्त करण्याची कारवाई केली पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत तिन आरोपींकडून प्रतिबंधीत अवैध गुटखा,मोटार सायकल,मोबाईल असा १,२३,८८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात विषारी पदार्थ गुटखा ज्यामुळे कर्करोगा सारखे दुर्धर जिवघेणे आजार होतात असे माहित असतांना देखील मोटार सायकल द्वारे अवैध गुटखा विक्री (तस्करी) करण्यासाठी नेत असतांना तसेच अवैध गुटखा साठा केल्याचे कारणावरुन शेख जुबेर शेख हबीब रा.मस्तानपूरा पुर्णा,गजानन बबनआप्पा राऊत रा.पुर्णा,मारोती घोरबांड रा.एरंडेश्वर ता.पुर्णा यांच्या विरोधात गुरनं.२७९/१९ भादवी कलम ३२८,२७२,२७३,१८८,१२० (ब) व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ नियम नियमन २०११ कलम २६(२)(६) २७ कलम २३ सहवाचन कलम ३०(२)(अ) ५९(६) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून तिन आरोपीं पैकी दोन आरोपी शेख जुबेर शेख हबीब,गजानन राऊत हे आरोपी अटक असून यातील एरंडेश्वर येथील आरोपी मारोती घोरंबांड हा अद्यापही फरार आहे
पुर्णा पोलीस स्थानकाचे पो.नि.सुभाषराव राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्थानकातील अत्यंत कर्तव्यदक्ष आणी गुन्हेगारांचा कर्दनकाळ असणारे रिअल सिंघम म्हणून संपूर्ण तालुक्याला परिचीत असलेले स.पो.उप.नि.चंद्रकांत पवार यांनी अवैध गुटखा तस्कर तसेच अवैध गुटखा विक्रेत्यांविरोधात अत्यंत कठोर कारवाई करत अवैध गुटखा तस्करांची अक्षरशः आर्थिक नसबंदी केल्याने अवैध गुटखा तस्करांची चवताळलेल्या कुत्र्या प्रमाणे अवस्था झाली असून पो.नि.राठौड व सपोउपनि. चंद्रकांत पवार हे आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून अवैध गुटखा तस्करी प्रकरणात कुठल्याच राजकीय हस्तक्षेपाला किंवा आर्थिक तडजोडीला भिक घालत नसल्यामुळे आर्थिक दृष्ट्या प्रबळ झालेले अवैध गुटखा तस्कर त्यांच्या विरोधात कुभांड रचून त्यांना बदणाम करण्याचा कुटील डाव आखत असले तरीही वरिष्ठ आधिकारी पो.नि.सुभाषराव राठौड व सपोउपनि.पवार यांच्या पाठीशी संपूर्ण तालुक्यातील सर्वसामान्य जनता उभी असल्याचे निदर्शनास येत आहे..
0 टिप्पण्या