💥सोयाबीन पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंताग्रस्त💥
💥प्रतिनिधी - रामा पारवे
पुर्णा/तालुक्यातील गौर,चुडावा,ताडकळस,एरंडेश्वर,वजूर,कावलगाव,आदी जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गावांतील शेत शिवारात सतत पाऊस पडत असल्याने तसेच वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे परीसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक संकटात आल्याचे दिसत असून शेत शिवारातील सोयाबीन पिक 83 दिवसात पिवळे झाल्याचे दिसत असून सोयाबीन पिकावर विषाणूजन्य बुरसी रोगाची लागन झाल्याचे दिसत असून शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसत आहे.
तालुक्यात सतत होत असलेल्या पावसाने व वातावरणात होत असलेले रोजचे बदल यामुळे सोयाबीन पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेंगा परिपक्व होण्या अगोदरच सोयाबीन पीक पिवळे पडत आहे यामुळेे मागील पाच वर्षापासून दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांत अत्यंत चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.
चुडावा,लिमला,कात्नेश्वर,पुर्णा,ताडकळस या पाच महसूल मंडळा अंतर्गत येणारी तालुक्यातील ८० ते ९० गावातील शिवारात यावर्षी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने,या भागातील शेतकऱ्यांनी मोठी हिमत करून पेरणी केली हलकासा पाऊस पडत गेला पिके कशी बशी जगली परंतु उशिरा का होईना बैल पोळ्याला जोरदार पाऊस झाला अन् पिके जोमदार डोलू लागली यामुळे लवकर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाच्या शेंगा परिपक्व होत आहेत परंतु उशिरा पेरणी केलेले सोयाबीन एंशी ते पांच्याऐंशी दिवसाचे असून सध्या शेंगा भरण्याची अवस्था आहे परंतु अज्ञात विषाणूजन्य रोगाने सोयाबीन दाने भरण्या अगोदरच वाळत असल्यामुळे हाताला आलेले पीक जाते की काय ?
या चिंतेत असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होण्याचे शेतकऱ्यांतून बोलल्या जात असून तालुक्यातील ऋषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बांधावर जाऊन शेत शिवाराची पाहणी करुन पिकांवर पडलेल्या रोगाबाबत शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करणे गरजेचे असतांना असे होत नसल्याने शेतकऱ्यांना हाता तोंडाशी आलेली पिके हातची जाण्याची वेळ येत आहे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देऊन या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे...
0 टिप्पण्या