💥आग्या मोहोळातील माश्यांच्या हल्ल्यात तब्बल १५ लोक जख्मी यात एक बालकाचाही समावेश💥
पुर्णा/तालुक्यातील मौ.निळा या पुर्णा नदी तिरावर असलेल्या जुन्या गावात आज शनिवार दि.२८ सप्टेंबर रोजी दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास येथील लोचनाबाई सुर्यवंशी यांच्या अंत्यविधी असल्याने अंत्यविधीस गावातील गावकरी मंडळी व पाहुणे मंडळी येथील पुर्णा नदी तिरावर असलेल्या स्मशान भुमीत जमले असतांना परिसरात असलेल्या एका झाडावर भले मोठे आग्या मोहोळ होते.अत्यविधीची तयारी सुरु असतांना सदरील अंत्यविधीस आलेल्या काही लोकांना आग्या मोहोळापासून धोका असल्याची बाब निदर्शनास आली यावेळी तात्काळ अंत्यविधीस आलेल्या महिलांना तेथून काढून देण्यात आले सदरील महिला काही अंतरावर पोहोचताच आग्या मोहोळ उठून त्यातील अत्यंत विषारी माश्यांनी अंत्यविधीस आलेल्या पुरुष महिला व एका बालकावर हल्ला केल्याने धावपळीस सुरुवात झाली अंत्यविधीस आलेले गावकरी व पाहूने माश्यांपासून बचाव करण्यासाठी मिळेल त्या दिशेने धावू लागले परंतु यावरही आक्रमक झालेल्या आग्या मोहोळातील माश्यांनी पिच्छा सोडला नाही व पंधरा लोकांसह एका बालकावर हल्ला करीत तब्बल सोळा लोकांचा चावा घेऊन गंभीर जख्मी केल्याची दुर्दैवी घटना घडली सदरील घटनेची माहिती याच गावातील युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष माणिकराव सुर्यवंशी यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.
0 टिप्पण्या