💥परभणी जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह...?


💥अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांसह खानावळीच्या नावावर धाबे चालवऱ्यांना अवैध दारु विक्रीची खुली सुट💥

परभणी/जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक केशव राऊत यांनी जिल्ह्यात सर्वत्र अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांसह त्यांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या देशी-विदेशी दारु पुरवठा करणाऱ्या परवाना धारक देशी-विदेशी दारु दुकानदार तसेच बिअरबार चालकांना खुली सुट दिली आहे की काय ? असा प्रश्न जिल्ह्यासह अवैध देशी-विदेशी दारु विक्रीत जिल्ह्यात आघाडीवर असलेल्या पुर्णा तालुक्यात ही उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना डोळ्यात धुळ झोकण्यासाठी काही अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांस खानावळीच्या नावावर अवैध दारु विक्री करणाऱ्या खानावळ चालकांना सहा महिन्यात अवैध दारु विक्री संदर्भात एक केस देण्याची तर काहींना प्रती महिना ठराविक हप्ते देण्याची अट हीं घालण्यात येऊन अवैध देशी-विदेशी दारु विक्रीला प्रोत्साहन दस्तुरखूद्द जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीच देत असल्याचे अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांशी झालेल्या चर्चेतून निदर्शनास येत आहे.
पुर्णा तालुक्यातील पुर्णा-झिरोफाटा या राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक २२९ या मार्गावरील किंग बिअर बार व समाधान बिअर बार या अगदी रोडटच असलेल्या बिअरबार ला परवानगी देतांना परिसरात वाहण पार्कींगची व्यवस्था आहे किंवा नाही याची पडताळनी न करता सामान्य वाहण चालक व ग्राहकांचा जिव धोक्यात घालून परवानगी दिली कशी ? असा प्रश्न उपस्थित होत असून राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी संबंधित बिअरबार चालकांशी साटेलोटे करुन आपल्या गळथान कारभाराचा प्रत्यय सर्वसामान्यांना आणून दिल्याचे यावरून सिध्द होत आहे याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे शहरातील सर्वच बिअरबार रेस्टॉरंटचे चालक शासनाचे सर्वच नियमांची पायमल्ली करीत केवळ दारु विक्रीला प्राधान्य देऊन ग्राहकांची कुचंबना करीत असतांना मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकार्यक्षम कारभारामुळे पुर्णा शहरात राज्य शासनाचा विक्रीकर बुडवून एफ एल २ चा अर्थात वाईन शॉपचा माल मोठ्या प्रमाणात एफ एल ३ अर्थात बिअरबार मध्ये विक्री करीता जात असल्याने शासनाचा प्रतिमहिना लाखो रुपयांचा महसुल बुडवण्याचे उद्योगही चालत असल्याचे निदर्शनास येत आहे.
पुर्णा शहरात जैस्वाल कंपनीच्या एकून ५ बिअरबार रेस्टॉरंट असून संपूर्ण तालुक्यात रवि रतनलाल जैस्वाल यांची एकमेव वाईन शॉप असल्याने 'वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा' अशी दुर्दैवी अवस्था पाहावयास मिळत असून संबंधित वाईन शॉप चालकाचे राजकीय पुढाऱ्यांशी घनिष्ट संबंध असल्यामुळे दारु विक्रीचे मनमानी दर आणी दबंग मनमानी कारभार चालत असल्याचे पाहावयास मिळत आहे.एकंदरीत शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोकाळलेल्या अवैध देशी-विदेशी दारु विक्रीसह परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेत्याकडून होणाऱ्या अवैध दारु पुरवठ्याला व बिअरबार रेस्टॉरंट चालकांच्या मनमानी कारभाराला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे समर्थनच असल्याचे पाहावयास मिळत आहे.
पुर्णा शहराची पोलीस प्रशासनासह शासन दफ्तरी अतिसंवेदशील शहर म्हणून नोंद असतांना शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गासह मुख्य बाजारपेठेतील टिळकरोड परिसरात परवाना धारक देशी-विदेशी दारु दुकानांसह याच परवाना धारकांच्या सहकार्याने सन-उत्सव महापुरुषांच्या जयंती महोत्सव दिनी बंदच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी दारुचीही विक्री केली जाते त्यामुळे परिसरातील व्यापारी नागरीकांसह रहिवासीही त्रस्त झाल्याचे पाहावयास मिळत असून सदरील दारु दुकाने दंगलीसह वादांना कारणीभूत ठरत असल्याने सदरील देशी-विदेशी दारु दुकाने शहरा बाहेर स्थलांतरीत करण्याची मागणी जोर धरु लागली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या