💥सामाजिक कार्यकर्ते राज नारायनकर आणी जेष्ठ पत्रकार विजय बघाटे यांनी निदर्शनास आणली घटना💥
पुर्णा/जागृत नागरिकांची जागृकता कुणाला तरी न्याय मिळवून देण्याचे पुण्यकर्म पार पाडत असते प्रत्येक नागरिकाने समाजाप्रती असलेली आपली जवाबदारी पार पाडल्यास सर्वसामान्यांना निश्चितच न्याय मिळत असतो अश्याच प्रकार काल मंगळवार दि.१७ सप्टेंबर २०१९ रोजी घडला शहरातील सामाजिक कार्यकर्ते राज नारायनकर रेल्वे परिसरातून शहरात येत असतांना त्यांना एक अनोळखी वयोवृध्द महिला अत्यंत आजारी अवस्थेत रेल्वे स्थानक क्रमांक १ वरील जुन्या व नवीन दादऱ्याच्या मध्यभागी पडलेली असल्याचे निदर्शनास आले.यावेळी त्यांनी त्या महिले संदर्भात अधिक माहिती घेतली असता असे समजले की अनोळखी वृध्द महिला मागील तिन दिवसापासून त्याच जागेवर पडली आहे परंतु तिच्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.लोहमार्ग पोलीस रेल्वे सुरक्षा बलाकडे तर रेल्वे सुरक्षा बल लोहमार्ग पोलीस प्रशाकडे बोट दाखवून आपली जवाबदारी झटकत असल्याचा प्रकारही यावेळी समोर आला.मानुसकीला काळीमा फासण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल सदरील बाब अत्यंत गंभीर असल्याने राज नारायनकर यांनी क्षणाचाही विलंब नकरता घटनेची छायाचित्रे सोशल मिडियावर तर टाकलीच शिवाय जंग-ए-अजीतन्युज वेब वृत्तवाहिणीला पाठवली यावेळी घटना अत्यंत हृदयस्पर्षी असल्याने तात्काळ आम्ही वृत्त प्रकाशित केले.सदरील वृत्त वाचताच अत्यंत जागृत वाचक तसेच तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तथा तालुक्यातील संपूर्ण पत्राकारांचे आदर्श असलेले श्री.विजय बघाटे सर यांनी सदरील वृत्त रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना फारवर्ड केले परंतु यानंतर हीं अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या आजारी वृध्द महिलेला शासकीय रुग्नालयात दाखल नकरता रात्री उशीरा ०१-०० वाजेच्या सुमारास काही नागरिकांच्या मदतीने दवाखान्यात दाखल केल्याचे समजते या घटनेत श्री.बघाटे सरांनीही अत्यंत मोलाची भुमिका बजावल्याने त्या अनोळखी वयोवृध्द आजारी महिलेला रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्नालयात उपचार कामी दाखल केले असल्याचे समजते जवाबदार जागृत नागरिकांची जागृकता सर्वसामान्यांना निश्चितच न्याय मिळवून देत असते त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जागृत राहणे किती गरजेचे असते हे सामाजिक कार्यकर्ते राज नारायनकर आणी जेष्ठ पत्रकार श्री.विजय बगाटे यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे...
0 टिप्पण्या